###Good evening !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
|| आज दिनांक - १९ आक्टोंबर २०१९ राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज पुण्यतिथी निमित्तानं ||
* "या झोपडीत माझ्या" *
----------------------------------
*आनंद साठवा रे,या झोपडीत माझ्या,राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली,ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या॥१॥*
*भूमीवरी पडावे, ताऱ्याकडे पहावे प्रभुनाम* *नित्य गावे, या झोपडीत माझ्या. ॥२॥*
*पहारे आणि तिजोर्या, त्यातूनी होती चोर्या,*
*दारास नाही दोर्या, या झोपडीत माझ्या. ॥३॥*
*जाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आला,*
*भिती नं यावयाला, या झोपडीत माझ्या. ॥४॥*
*महाली मऊ बिछाने, कंदील शामदाने,*
*आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या॥५॥*
*येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा,*
*कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या॥६॥*
*पाहून सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे,*
*शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या॥७॥*
*किती वाटतो आनंद,या झोपडीत माझ्या*
*"राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज"* यांनी वर्णिलेली ही गरीबाची झोपडी.!! किती यथार्थ व सुंदर कल्पना आहे. झोपडीतच खरे प्रेम, ममता, वात्सल्य, निरपेक्षता इ. सारे सदगुण ठासुन भरलेले असतात. मात्र, पैसेवाल्यांच्या महालात याच गोष्टींची वाणवा असते.
पैसा माणसा माणसात, नात्यांमध्ये दुरावाच निर्माण करतो. पैश्यावाल्यांच्या महालात बेगडीपणा असतो. गरीब मनापासुन प्रेम करतो. पण त्याच्या प्रेमाला कुणीच किंमत देत नाही. हा काळाचा महीमा मानावा काय.?
हि कविता वाचुन यांवर प्रामाणिक विचार केला, तरच यातील मर्म लगेच लक्षात येईल.!!
*!! जय श्री गुरुदेव !!*
?