जीवन कसे जगावे?
हा प्रश्न समाजातील खूप जणाना पडली असेल. माझे 73 वर्षाचे आयुष्यातले अनुभव मी तुमच्याशी शेअर करत आहे. मराठी मात्रुभारती मुळे लेखक आणि वाचकांना खूप चांगली सोय झाली आहे की आपण मनापासून लेखन किंवा वाचन करू शकतो. App. डेव्हलपर्स ना मनापासून धन्यवाद देवून माझे मत मांडायला सुरूवात करतो.
आपण ,? हसत जगाव की रडत ? जगावे प्रत्येक मााणसानी आपले आपण ठरवायला हव. तरीही माझे मत मी मांडलेेआहे.
१. रोज सकाळी उठल्यावर आई,वडिलांना नमस्कार करावे.
२.सद्गुरू ना नमस्कार करावे. सद्गुरू नसेल तर लवकरात लवकर सद्गुरू शोधून, त्यांच्या दास व्हावा. सद्गुरू शिवाय मोक्षप्राप्ती होणार नाही.
३. दिनचर्येत दिवस चांगला घालवावा.चांगला, वाईट हे ठरवायला सद्बुद्धी लागते. हे सद्गुरु देतात. म्हणून सद्गुरु करायला सांगितले आहे. सद्गुरू कसे शोधावे, हे दुसरे लेखात चर्चा करू.
४. नोकरी किंवा व्यवसाय प्रामाणिकपणेने, चतूराईने,निस्वार्थिपणे ने केले तर उत्तम. ह्याचा उलट केला तर आपले नुकसान च होणार हे लक्षात असू द्या.
५. दिवसातले २/४ तास कुटुंबातील सदस्यांच्या बरोबर वेळ घालावे. त्यांच्या सुख दुःखाचे गोष्टी ऐकून चांगले उपदेश करावे.
६. नियमितपणे फलाहार, जेवण, झोप, विश्रांती घेत जाणे.व्यायामाची सवयी ठेवा.
७. समाजात मानाने रहा. लोकांना बोलण्यासारखे वागूनका.
८. रोज ज्ञानात भर घालत जा.
९. कोणाकडून ही काही ही अपेक्षा करू नका.
१०. सतत नामस्मरणात राहण्याची प्रयत्न करा.