???राम कृष्ण हरी???
जनी म्हणे पांडुरंगा ।माझ्या जीवींच्या जिवलगा ।विनविते सांगा ।महिमा साधुसंतांचा ॥१॥
कैसी वसविली पंढरी ।काय महिमा भीमातीरीं ।पुंडलिकाच्या द्वारीं ।कां उभा राहिलासी ॥२॥
कैसा आला हा गोविंद ।कैसा झाला वेणुनाद ।येउनी नारद कां राहिला ॥३॥
कृपा करा नारायणा ।सांगा अंतरींच्या खुणा ।
येऊं दे करुणा ।दासी जनी विनवितसे ॥४॥
?????????