नोकरी करणारा प्रत्येक माणसाच्या रिटायरमेंट नंतरच्या अनुभव निराळ्याच असतात. चांगले आणि वाईट चा मिश्रण अनुभव बघायला व ऐकायला मिळतात. माझे एक मित्र जोसेफ म्हणून होते. एक पब्लिक सेक्टर मधून निव्रत्त झाले. बायको हौसवाइफ होती. जोसेफ ना गम्मत करण्यात मजा येत होता. त्यांना कोणी विचारले की वेळ कसे घालवता , ते लेक्चर द्यायला सुरूच करायचे.
" मी रिटायर झाल्यावर माझे स्किल्स खूप वाढले.
१. भाज्या स्वच्छ करून चिरणे. तसेच भाज्या करणे.
२. घर स्वच्छ ठेवणे, जे मला मुळीच आवडत नाही.
३. बायको चे बोलणे ऐकणे. नोकरीच्या ४२ वर्ष मला कोणी ही बोलले नाही. मीच बाँस होतो. मला कोण बोलणार?
४. बायको बोलताना तोंड बंद ठेवणे. तोंड उघडले तर भांडणच होणार ना!
५. वाशिंग मशीन चालविणे. मशीन आँपरेटर झालो.
६. कपडेचे घडी घालून कपाटात नीट ठेवणे. कसेही ठेवले तर आमच्या सौ.ला चालणार नाही.
७. लांड्रित कपडे देणे आणि परत आणणे.
८. किराणा सामानांचा यादी बनवून, सामान आणणे.
९. सामान आणल्यावर ते काढून ठरलेल्या डब्यात ठेवणे.
१०. बायकोला घराबाहेर होटेल, सिनेमा इत्यादी चा मनसोक्त आनंद देणे." पगार नसताना खर्चाची बाब.
. ......
असे सांगून पुढे ते विचारायचे की अजून काय शिकायचे असेल तर सांगा, म्हणजे मी तयार होईन..हा हा हा...