###$Good afternoon !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
*?वारकरी पुष्प *?
----------------------------
*?आज वामन जयंती सर्वांना हार्दिक शुभेच्छा* ?
??????
*मानवी जीवनात सर्वात मोठे तीर्थ, अगणित पुण्याईची कमाई करणे; म्हणजे नामस्मरण हे करण्यास कुठल्याही उपकरणाची किंवा उपचारांची गरज नाही. दिसायला छोटे व फळ देण्यास मोठे , अत्यंत उत्कृष्ट व उपाधी रहित असे हे पुण्यपद साधन आहे*.
*नामस्मरणात आपले कल्याण करण्याचे विलक्षण सामर्थ्य आहे; परंतु प्रत्यक्षात मात्र हे घेण्याची सुबुध्दी फारच थोड्या लोकांना होते याचे प्रमुख कारण म्हणजे लोकांचा या सोप्या साधनेवर विश्वास बसत नाही*.
*" नाम घेऊन काय होणार ?"* असा अजागळ प्रश्न ते विचारतात. *" नाम घेऊन काय घडते !"* हे मात्र अनुभवण्याचा प्रत्यक्ष प्रयत्न त्यांचेकडून घडत नाही.
दुसरे महत्त्वाचे कारण असे की , *माणसाचे मन हे मुळातच अतीव चंचल असल्यामुळे अशा चंचल मनांत नामाची धारणा होत नाही.*
त्यासाठी *संत संगतीत राहून अट्टाहासाने नाम घेण्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे.* असा अभ्यास केल्याने नाम खोल अंतर्मनात पोहोचते व तेच नाम परिपक्व होवून आपल्या जीवनात प्रगट होते.
अशा रीतीने *संसार त्याग न करितां , उद्योगधंदा सांभाळून एका बाजूने पैशाची कमाई करणे व दुसऱ्या बाजूने इतरांना त्रास, ताप, उपद्रव किंवा दुःख न देता व नित्य नामस्मरण करुन पुण्याईची कमाई करणे* हा संसार सुखाचा करण्याचा राजमार्ग होय.
*??रामकृष्णहरि ??*