####Good morning !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
" हल्लीचे किर्तनकार "
-------------------------------
??राम कृष्ण हरि ??
????????
जेथे किर्तन करावे ॥ तेथे अन्न न सेवावे ||१||
बुका लावू नये भाळा ॥ माळा लावू नये गळा ||२||
तट्टा वृषभासी दाणा ॥ तृण मागो नये जाणा ||३||
तुका म्हणे द्रव्ये घेती ॥ देती ते दोही नरका जाती ||४||
????????
भावार्थ:- अशा प्रकारे संत तुकोबारायांनी आपल्या अनेक अभंगातुन कथाकार,किर्तनकार,व्याख्यानकार यांच्यावर आसुड ओढले आहेत.परंतु हे किर्तनकार मुद्दामहुन तुकोबाच्या अशा अभंगाकडे दुर्लक्ष करतात.एकीकडे तुकोबाचे वारसदार,वारकरी संप्रदायाचे वारसदार असल्याचा आव आणतात आणि पद्धतशीरपणे जनतेला लुबाडण्याचे धंदे करतात.
३५० वर्षापुर्वी तुकोबांनी लिहुन ठेवलेले अभंग हे अशा महाराज लोकांसाठी झणझणीत अंजन आहेत.परंतु आजही आम्हाला खरे तुकोबाराय समजलेच नाहीत.हे आमचे दुर्दैव आहे.सत्यनारायण कथेची पुजा करण्यापेक्षा घरोघर तुकोबाच्या गाथेची पारायणे व्हायला हवीत तरच समाज जागृती घडेल अन अशा भोंदू किर्तनकारापासुन भोळाभाबडा समाज दुर राहील.आणि तुकाराम महाराजांनी भक्तासाठी स्वतःचे आयुष्य सार्थकी घातले असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
??शुभ सकाळ ??