####Good night!
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
*आज महावैष्णव श्री ज्ञानेश्वर महाराजांची जयंती...*
श्रावण कृष्णाष्टमी, शके ११९७ (इ.स. १२९५) ला म्हणजेच श्री कृष्ण जन्माष्टमीला विठ्ठलपंत व रूक्मीणी मातेच्या पोटी कृष्णनामे पावन असणाऱ्या वारकऱ्यांच्या घरात ज्ञानोबारायांचा जन्म झाला.
ज्ञानोबाराय हा महाराष्ट्राच्या जिवनधर्माचा आधार आहे. ज्यांना तत्त्वज्ञान ऐकण्याचाही अधिकार नव्हता त्यांना तत्वज्ञान सांगण्याचा अधिकार माऊलींनी मिळवून दिला. ज्यांना मोक्षाचा अधिकारच नव्हता त्यांच्यासाठी माऊलींनी 'मुक्तीची गंवादी' घातली.
कुळ-जात-वर्ण यांचा अभिमान मोडीत काढून पंढरीला आध्यात्मिक लोकशाहीची राजधानी बनवणारे प्रवर्तक म्हणजे श्री ज्ञानोबाराय महाराज. संस्कृत वगळता इतर प्रादेशिक भाषेत गितेवर भाष्य लिहण्याचा पहिला मान ज्ञानोबारायांचाच आहे. वारकरी संप्रदायाला 'ज्ञानेश्वरी' हा प्रमाण ग्रंथ दिला. त्यामुळं मराठी समृद्ध झाली.
महाराष्ट्राला गितेच्या चौकटीत विचार करायची सवय लावली त्यामुळे गितेवरील सर्वाधिक भाष्ये मराठीत लिहली गेली. ते भक्तीचे आचार्य आहेत... प्रेमाचे आचार्य आहेत.
भक्ती -भाषा- संस्कृती- लोकव्यवहार यावर सदगुरू ज्ञानोबारायांचे अनंत उपकार आहे.
*ज्ञानाबाई माझी अनाथाची माय !*
*एका जनार्दनी पाय वंदितसे!!....*
*!! जय माऊली!!*
?