Marathi Quote in Blog by मच्छिंद्र माळी

Blog quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

####Good morning !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .



*नागपंचमीचे महत्व आणि माहिती*
----------------------------------------------

*श्रावण महिन्यातील पहिला महत्वाचा सण नागपंचमी .*

या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करतात.
हा सण वेदकालापासून सुरू झाला.
भगवान श्रीकृष्ण कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून सुरक्षीत वर आले तो दिवस श्रावण शुध्द पंचमी होता.
तेव्हांपासून नागपूजा प्रचारात आली असे म्हणतात.
या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही.
कोणीही खणत नाही,घरीपण कोणीही भाज्या चिरायच्या नाही,तवा वापरायचा नाही, हे नियम पाळत असतात.
*नागदेवताची पूजा करून त्याला दूध लाह्यांचा नैवेद्य दाखवतात,गव्हाच्या खिरीचा नैवेद्य दाखविला जातो.*
श्रावण सुरु होतो आणि श्रावण महीन्यातील शुद्ध पंचमीला येणारा,पहीला महत्वाचा सण म्हणजे “नागपंचमी”च्या दिवशी हाच नागराज घरोघरी देवतेच्या रुपात विराजमान होतो.
*नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये,कापू नये, तळू नये,चुलीवर तवा ठेवू नये वगैरे संकेत पाळले जातात.*
*तसेच या दिवशी जमीन खणु नये,शेतामध्ये नांगर चालवु नयेअसेही म्हणले जाते*
श्रावणातील बहुतेक सणांना इतिहास आहे.तो इतिहास कथांच्या स्वरुपातुन पिढ्यांपिढ्या पुढे पोहोचवला जातो.
प्रचलीत कथा
एका राज्यात एक गरीब शेतकरी कुटुंब होते.
त्या शेतकर्‍याला दोन मुले व एक मुलगी होती. एकदा शेतात नांगर फिरवत असताना शेतकर्‍याकडून नागाची तीन पिल्ले चिरडून मरण पावतात.
मरण पावलेल्या पिल्लांकडे पाहून नागिणीने आक्रोश केला.
त्यानंतर नागिणीच्या मनात त्या शेतकर्‍याविषयी सूडाची आग धगधगू लागली.
एके दिवशी तिने शेतकर्‍याचा सूड घ्यायचे ठरवले.
रात्री अंधाराचा फायदा घेऊन नागीण शेतकर्‍यासह त्याची पत्नी व दोन मुलांना डसली.
दुसर्‍या दिवशी नागीण पुन्हा शेतकर्‍याच्या मुलीला डसण्यासाठी त्याच्या घरी आली.
परंतु नागीणीला पाहताच शेतकर्‍याच्या मुलीने नागिणीसमोर दुधानेभरलेली वाटी ठेवली.तिची क्षमा मागितली.
शेतकर्‍याच्या मुलीची श्रद्धा पाहूननागीण तिच्यावर प्रसन्न झाली.
त्यानंतरनागिणीने तिचे आई-वडील व दोन भाऊ यांना जिवंतकेले.
*तो दिवस श्रावण शुक्ल पंचमीचा.*
या दिवसापासून नागदेवतेचा कोप दूर करण्यासाठी श्रावण महिन्यात येणार्‍या पंचमीला नागाचे विधिवत पूजन केले जाते.
*उपवासाचे महत्त्व*
पाच युगांपूर्वी सत्येश्‍वरी नावाचीएक कनिष्ठ देवी होती. सत्येश्‍वर हा तिचाभाऊ होता.सत्येश्‍वराचा मृत्यु नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला.
त्यामुळे भावाच्या शोकात सत्येश्‍वरीने अन्न ग्रहण केले नाही.
या दिवशी स्त्रिया भावाच्या नावाने उपवास करतात.
नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक बहिणीने भावासाठी देवतांकडे हाक मारल्यास त्याचा भावाला ७५ टक्के लाभ होतो.
सत्येश्‍वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला.
तेव्हा तिने त्यानागरूपाला आपलाभाऊ मानले.त्या वेळी नागदेवतेने वचन दिले की,जी बहीण माझी भाऊ म्हणूनपूजा करील,तिचे रक्षण मी करीन.


*नवीन वस्त्रे व अलंकार घालण्याचे कारण*

सत्येश्‍वरीचा भावासाठीचा शोक पाहून नागदेव प्रसन्न झाला.त्याने तिचाशोक दूर करण्यासाठी वतिला आनंदी करण्यासाठी नवीन वस्त्रे परिधान करण्यासाठी दिली.
तसेच निरनिराळे अलंकार देऊन तिला सजवले.
त्यातून सत्येश्‍वर समाधानी झाला.

सत्येश्‍वर नागराजाच्या रूपात सत्यश्‍वेरीच्या पुढ्यात उभा राहिला.
`तो निघून जाईल’,असे वाटून तिनेत्याच्याकडून म्हणजे नागराजाकडून तसे हातांवर वचन घेतले.
ते वचनदेतांना सत्येश्‍वरीच्याहातांवर वचनचिन्ह निर्माण झाले.
*झोका खेळण्याचे महत्त्व* दुसर्‍यादिवशी सत्येश्‍वरीला नागराज दिसला नाही.
तेव्हाती जंगलात सैरावैरा भटकू लागली वशोधता शोधता झाडांच्याफांद्यांवर चढून पाहू लागली.
त्यानंतर नागराजाने तिला दृश्य स्वरूपात समोर येऊन सत्येश्‍वराचे रूप प्रकट केले.
तेव्हाती आनंदाने झाडांच्या फांद्यांवर झोके घेऊ लागली.
त्यामुळे स्त्रिया त्या दिवशी झोका खेळतात.

*श्रीकृष्णाने यमुनेच्या डोहातील कालिया नागाचे मर्दन केले. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता.*
नागपंचमीच्या दिवशी सर्पाला मिळणारे अवास्तव महत्व जाणुन गारुडी लोकांनी त्याचा गैरफायदा घ्यायला सुरुवात केली.

ह्यासाठीच सरकारने नागपंचमीच्या दिवशी ’नागोबाला दुध’ म्हणत फिरणार्‍या लोकांवर बंदी घातली.
अर्थात खरे सर्प उपलब्ध नसले तरी बहुतेक ठिकाणी नागदेवतेच्या प्रतिमेची पुजा केली जाते.
दुध, भाजलेले चणे, भात, लाह्या वगैरेंचा नैवेद्य दाखवला जातो.

Marathi Blog by मच्छिंद्र माळी : 111231055
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now