Marathi Quote in Blog by मच्छिंद्र माळी

Blog quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

####संत दर्शन
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
***********************
*??भागवत धर्माचे आद्यप्रचारक आत्मचरित्रकार श्री संत नामदेव महाराज पुण्यतीथी*
*??संत नामदेव (इ.स. १२७०–जुलै ३, इ.स.१३५०) हे महाराष्ट्रातील वारकरी संतकवी होते.त्यांचे आडनाव रेळेकर असे होते.ते मराठी भाषांमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते. त्यांनी पंजाबी व व्रज भाषांमध्येही काव्ये रचली.शिखांच्या गुरू ग्रंथसाहिबात त्यांच्या बासष्ट काव्यरचना समाविष्ट आहेत.*

*??नामदेव हे ‘मराठीतील'पहिले चरित्रकार व आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते.त्यामुळे आज त्यांच्या जन्म स्थानी पंजाबी मंडळी त्यांवया जन्म स्थानी नर्सी या गावाचा विकास करण्यासाठी धडपडत आहेत.*

*??भक्तशिरोमणी संत नामदेव हे संत ज्ञानेश्वरांच्या कालखंडात होऊन गेले.वारकरी संप्रदायाचे प्रचारक नामदेव महाराज नामवेदाचे व नामविद्येचे आद्य प्रणेते असलेले महाराष्ट्रातील हे एक थोर संत होत.आपल्या कीर्तनकलेमुळे प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावणारी अशी त्यांची कीर्ती होती.संत नामदेव प्रत्यक्ष श्रीविठ्ठलाच्या निकटवर्ती असलेला सखा होता,असे मानले जाते. संत नामदेव हे वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक असून भारतभर त्यांनी त्या बाबतीत भावनिक एकात्मता साधली.भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य त्यांनी स्वकर्तृत्वाने केले.*

*??दामाशेटी हे संत नामदेवांचे वडील व गोणाई त्यांची माता होती.दामाशेटींचा व्यवसाय कपडे शिवणे हा होता.म्हणजे ते शिंपी होते.यांच्या अगोदरच्या सातव्या पिढीतील पुरुष यदुशेट हे सात्त्विक प्रवृत्तीचे भगवद्भक्त होते.सध्याच्या हिंगोली जिल्ह्यातील नरसी-बामणी हे संत नामदेवांचे जन्म गाव होय.नामदेवांचा जन्म प्रभव नाम संवत्सरात,शके ११९२ (इ.स.१२७०)मध्ये कार्तिक शुद्ध एकादशीस,रोहिणी नक्षत्रास,रविवारी झाला. संत नामदेवांना ८० वर्षांचे आयुष्य लाभले.त्यांचे बालपण हे पंढरपूरात गेले. त्यांनी लहानपणापासूनच श्रीविठ्ठलाची अनन्यसाधारण भक्ती केली.*

*??संत गोरा कुंभार यांच्याकडे,तेरढोकी येथे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव,मुक्ताबाई,संत नामदेव,चोखामेळा,विसोबा खेचर आदी संतांचा मेळा जमला होता.याच प्रसंगी संत ज्ञानेश्वरांच्या विनंतीवरून गोरोबाकाकांनी उपस्थितांच्या आध्यात्मिक तयारीविषयी आपले मतप्रदर्शन केले होते.या प्रसंगानंतरच संत नामदेवांना विसोबा खेचर हे आध्यात्मिक गुरू म्हणून लाभले.*

*??पत्‍नी राजाई,मोठी बहीण आऊबाई; नारा,विठा, गोंदा,महादा हे त्यांचे चार पुत्र व एक मुलगी लिंबाई असा संत नामदेवांचा परिवार होता.त्यांच्या कुटुंबात एकूण पंधरा माणसे होती.स्वतःला ‘नामयाची दासी’असे म्हणणार्‍या संत जनाबाई याही त्यांच्या परिवारातील एक सदस्य होत्या.*

*??संत नामदेवाची अभंगगाथा (सुमारे २५००अभंग) प्रसिद्ध आहे.त्यांनी हिंदी भाषेत काही अभंग रचना (सुमारे १२५ पदे) केली.त्यातील सुमारे बासष्ट अभंग (नामदेवजीकी मुखबानी) शीख पंथाच्या गुरुग्रंथ साहेबमध्ये गुरुमुखी लिपीत घेतलेले आहेत.संत नामदेवांना मराठी भाषेतील पहिले आत्मचरित्रकार व चरित्रकार मानले जाते.संत नामदेवांनी आदि, समाधी व तीर्थावळी किंवा तीर्थावली या गाथेतील तीन अध्यायांतून संत ज्ञानेश्वरांचे चरित्र सांगितले आहे.*

*??संत ज्ञानेश्ववरांच्या भेटीनंतर (इ.स.१२९१) संत नामदेवांचे आयुष्य पालटले.अनेक संतांबरोबर त्यांनी भारतभर तीर्थयात्रा केल्या.त्यांच्या सद्गुरूंनी म्हणजेच विसोबा खेचर यांनी त्यांना ब्रह्मसाक्षात्कार घडवून आणला, असे म्हणतात.त्यांच्या कीर्तनांत अनेक सद्ग्रंथांचा उल्लेख असे. यावरून ते बहुश्रुत व अभ्यासू असल्याचे लक्षात येते.‘नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग’-अशी त्यांची योग्यता होती. ’नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी’हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते.*

*??भागवत धर्माचे आद्य प्रचारक म्हणून संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीनंतर सुमारे ५० वर्षे भागवतधर्माचा प्रचार केला.प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची भावनिक एकात्मता जपण्याचे अवघड काम त्यांनी केले.पंजाबमधील शीख बांधवांना ते आपले वाटतात.

*??भगवद्भक्तांच्या व साधु-संतांच्या चरण धुळीचा स्पर्श व्हावा म्हणून पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी ‘पायरीचा दगड’ होण्यात त्यांनी धन्यता मानली. संत नामदेव हे आषाढ वद्य त्रयोदशी, शके १२७२ मध्ये (शनिवारी, दि. ३ जुलै, १३५० रोजी) पंढरपूर येथे पांडुरंगचरणी विलीन झाले.नक्की दिनांकाविषयी एकवाक्यता दिसून येत नाही.कालनिर्णय या दिनदर्शिकेत पुण्यतिथी दिनांक२४ जुलै असा दिलेला आढळतो.सत नामदेव यांनी आपल्या कीर्तनाच्या मध्य मातून त्यांनी भारतभर फिरले*
*??संत नामदेव महाराज पुण्यतिथी आषाढ क्रु 13 विनम्र अभिवादन??*

Marathi Blog by मच्छिंद्र माळी : 111227195
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now