###Good evening !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
ॐॐॐ आत्मा.
-----------------------------------
*** आ त्मा ***
---------------------------
।।आत्मा म्हणे शिव-नारायणा घाल म्हणी मानव जन्माला करीन तुमचे सुमरण मग मी ओळखीन साधू-संताला।।
वरील भजन हे श्री तुकाराम महाराजांनी लिहलेले असून आईच्या गर्भात असताना जवळपास प्रत्येक जण वरील वचन देऊन या जगात जन्म घेतो.काहींचा गर्भात मुत्यु होतो ते त्याचे विधीलिखित असते.
परंतु जन्म झाल्यावर कळत-नकळत दिलेले वचन विसरले जाते. व त्याची शिक्षा म्हणून आपणास शारीरिक,मानसिक दंड दिले जातात यातून काहीजण भक्ती मार्गाकडे वळून आपले मूळ वचन पाळण्याचे प्रयत्न करतात.काहीजण दुर्लक्ष करतात.काहीजणांना या जन्मात या गोष्टी समजतच नाही.
ज्या गुप्त शक्तीने हे सम्पूर्ण अवकाश,पृथ्वी,ग्रह,तारे,निसर्ग निर्माण केला त्याचा सर्वात जास्तीत -जास्त भोग हा मानव घेतो.येथून काहीही घेऊन जाता येत नाही हे माहीत असूनही तो नाना दुष्ट कर्म करून संपत्ती गोळा करणयात मग्न असतो.त्याच्या मेहनती नुसार चांगल्या कर्मानुसार मिळणाऱ्या संपत्तीत तो समाधान मानत नाही व त्यामुळे तो स्वतःहून आपल्यासाठी व कुटुंबासाठी दुःख,त्रास गोळा करतो.
साधू-संतांच्या सांगण्यानुसार या पृथ्वीवर आपण सर्व पाहुणे असून कधीही बोलावणे येऊ शकते.
आपल्या जन्माचे उद्दिष्ट्य हे या विश्वाच्या"कर्त्यास"ओळखणे असून या साठी आपणास
मदती साठी साधू, संत,गुरू,मार्गदर्शक नेहमी तयार असतात.
परंतु या साठी आपली शाररिक,मानसिक तयारी हवी. "निष्काम भाव" ही या साधनेत गुरू किल्ली असते.
मुंगीलाही साखरेच्या एका दान्याचे टेन्शन असते मग आपण तर मानव आहोत.भोग नेहमी भोगून पूर्ण करावा.?जय हरी विठ्ठल ?
||धन्य आम्ही जन्मा आलो | दास विठोबाचे झालो||??जय जय राम कृष्ण हरी??
, ,????हरीचा दास????