####Good afternoon ! अभंग तुकयाचे !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
शंखचक्रगदापद्म ।
पैल आला पुरुषोत्तम ॥१॥
ना भी ना भी भक्तराया ।
वेगीं पावलों सखया ॥२॥
दुरूनि येतां दिसे दृष्टी ।
धाकें दोष पळती सृष्टी ॥३॥
तुका देखोनि एकला ।
वैकुंठीहूनि हरि आला ॥४॥
?रामकृष्ण हरि?