मराठी नितीकथा ! (बोधकथा )
मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
*धृव बाळ* ( पुराण - कथा )
धृव बाळाच्या कथेचे वर्णन श्रीमद भगवत गीतेत मिळते. त्यानुसार त्याच्या वडिलांचे नाव उत्तानपाद होते. उत्तानपाद राजाला २ राण्या होत्या. सुनीती आणि सुरुची. ध्रुव हा सुनीती चा पुत्र होता. एकदा ध्रुव उत्तानपाद राजाच्या मांडीवर बसला असताना सुरुचीने त्याला असे सांगून खाली उतरवले की माझ्या पोटातून जन्माला येणाराच ही मांडी आणि सिंहासन यांचा अधिकारी आहे. बालक ध्रुव रडत रडत आपली आई सुनितीकडे गेला. आईने त्याला भगवंताच्या भक्तीनेच सर्व सुखे मिळतात असा मार्ग सुचवला. आईचे ऐकून धृवाने घर सोडले आणि तो जंगलात गेला. तिथे देवर्षी नारद यांच्या कृपेने ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राची दीक्षा घेतली. यमुना नदीच्या किनारी त्या बालकाने हा महामंत्र जपत घोर तप केले. एवढ्या छोट्या बालकाच्या तपाने प्रसन्न होऊन भगवान विष्णू प्रकट झाले. भगवान विष्णूंनी ध्रुवाला ध्रुव लोक प्रदान केले. आकाशात दिसणारा ध्रुव तारा बालक धृवाचेच प्रतिक आहे.
*!! औम नमो भगवते वसुदेवाय नम: !!*