?* श्रध्दा *?
---------------------------- मच्छिंद्र माळी औरं
गाबाद.
*मानवी जीवनात ही सृष्टी भगवंताने उत्पन्न केली असून तो सर्व ठिकाणी भरलेला आहे, तो आनंदमय आहे, आपण त्याचे अंश आहोत, मग आपण दुःखी का ? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे, तर याचे उत्तर असे की, 'देव आहे' असे खर्या अर्थाने आपण वागतच नाही,तसेच जिथे भगवंत आहे तिथे आपण त्याला पाहात नाही, व श्रद्धेने साधना करीत नाही. श्रद्धेशिवाय कधी कुणाला परमार्थ साधला का? श्रद्धा ही फार बळकट आणि मोठी शक्ति आहे. श्रद्धेने जे काम होईल ते कृतीने होणे कठीण जाते. विद्या, बुद्धी, कला, इत्यादि गोष्टी बिळासारख्या आहेत, त्यांच्यामधून श्रद्धा झिरपत जाते. विद्वानांची मते त्यांच्या अभ्यासामुळे आपापसांत जमत नाहीत आणि त्यामुळे आपली श्रद्धा डळमळते, आणि मग आपल्याला आणखी वाचन केल्याशिवाय चैनच पडत नाही. आपल्या स्वभावामध्ये भगवंताच्या श्रद्धेपासून उत्पन्न झालेला धीर पाहिजे. आपण आपल्या स्वतःवर जेवढी निष्ठा ठेवतो तेवढी जरी भगवंतावर ठेवली, तरी आपले काम होईल. नामात भगवंत आहे ही श्रद्धा ठेवावी, आणि अखंड भगवंताच्या नामस्मरणात राहण्याचा प्रयत्न करावा, हाच परमार्थाचा सोपा मार्ग आहे*.
*??रामकृष्णहरि*??