Marathi Quote in Blog by Komal Mankar

Blog quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

आयुष्यात काय हरवतं असं म्हटल्यावर मी नक्कीच म्हणेल ...
बालपण हरवतं , शाळेच्या प्रागणात केलेली मौजमस्ती हरवते .
अजून काही हरवतं असावं तर . शिक्षकांनी लावलेली शिस्त ...
आणि जे काही मोलाचं हरवतं असेल ते त्या काळात खळखळून
हसलेलं हास्य ...

आयुष्यात एवढचं काही हरवतं की माणसं देखील हरवतात ?? माणसं हरवत नसली तरी वेळेनुसार बदलतात जरूर . त्यांच्या बदलत्या रुपांची
कारणही शोधून काढली पाहिजे ना ! का बदलतात माणसं वेळेसोबत .
पैसा , गलेलठ्ठ पगार बघून की बढत्या इमेज सोबत घेऊन आलेला इगो हर्ट करत असावा म्हणून ....

परवा माझी जुणी मैत्रीण दिसली रस्त्यांना जातांना . हाक मारायला तोंड उघडलं होतं ; पण म्हटलं , नको उगीच एनर्जी खर्च होईल . आणि तिचा अँटिट्यूडही बिनधास्त बोलण्याला मागे सारत आड येईल .

वेळ बदलते माणसं का बदलणार नाहीत .

इलियट म्हणतो :

आगगाडीत बसलेले तुम्ही
हे स्टेशनवरचे तुम्ही नसता ,
किंवा पुढच्या स्टेशनवरचे तुम्ही नसाल .
आगबोटीच्या कठड्यावर वाकताना मागचा रस्ता
लाटांनी रुंदावलेल्या बघताना
तुम्ही म्हणू शकणार नाही की हा
टाकला मागे मी माझा
भूतकाळ आणि हा मी सामोरा भविष्याला ....

कारण , व्यक्ती बदलल्या तरी त्याच्यातल्या प्रवृरीच्या काही जिन्नस खुणा
त्यांच्या स्वभावगुणात रोवलेल्या असतातच . म्हणून त्या बदलत्या प्रवृत्तीला माणसं पण ह्या सर्वात हरवतात म्हटलं तर कुठे बिघडलं .

आणि आपल्या आयुष्याला प्रत्येकझण पुरतोच का ? कसा पुरणार . पूर्वीचे सर्व वाटेत आलेले आपल्या मार्गाने वाट दिशाहीन होऊन धुंडाळत रवाना होतातच . प्रत्येक वाटाड्या या प्रवासात उपयोगी नसतोच पण उपयोगासाठी म्हणून नाही . हृदयात त्याला खऱ्या दिलानं स्थान असावं . म्हणजे वाटेने तो कधी परत भेटलाच तर ताट मानेने चेहऱ्यावर चमक आणून एक स्मित तरी देता यावं . मग भेटी गाठी कितीही योग योगाचे बहाने असेल तरी ती शुल्लक ठरतात .

कितीतरी काळ लोटला असं वाटतंय . शेवटी तारखा त्या तारखा कँलेंडरच्या पानांचा आराखडाच तो . आपणही तिथेच बंधिस्त होतो .
कधी कधी वाटत माणुस घडीच्या काट्यावर नाचतो आणि तारखांवर चालतो . आणि असाच जिंदगीचा गाढा रेटत जातो .

Marathi Blog by Komal Mankar : 111185252
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now