मी स्वप्नजगी...
हलक्या तुझ्या अबोल चाहुली माझ्या मनीची सुप्त सावली भेटून त्या ओल्या सांजवेळी तुजविण वाटे ती एकटी मी स्वप्नजगी....
सोबतीच्या तुझ्या बावऱ्या खुणा पाहून पडे भूल मजवरी वेडावून भोवती चाले हा खेळ पुन्हा-पुन्हा नांदे मृगजळ हा उरी मी स्वप्नजगी....
रातराणीच्या कळ्या त्या स्वछंद डोलती होऊन मंदधुंद लुप्त होऊन राहवे वाटते माझ्या अंतरी तुझी झलक ती एक लाजरी मी स्वप्नजगी....
सारे जरी उमजूनी का लागते तुझी तृशा सांग फुलवू प्रेमकळ्या त्या कश्या पैलू तुझा नवा तेजस्वी भासला क्षणभरासाठी तुझा हात हाती हवासा वाटे या चांदराती मी स्वप्नजगी...
तुझ्या सोबतीचे मौन निरागस सूर तार मनीची छेडून व्हावे ते एकरूप हर्षावलेल्या मनी माझ्या दे झुळूक प्रेमाची तुझं रूप दिसु दे गोड गुलाबापरी मी स्वप्नजगी....