*मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
मराठी काविता # काव्योत्सव
# Kavyotsav 3
-----------------------------------------------------------------
३ " गुलाबी स्वप्न "
मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
डावा डोळा करी फडफड ऊरी भरे धडधडी |
अग सजनी तुझी माझी भारी जमली जोडी ||धृ ||
मी तुझा कृष्ण तु माझी राधा |
तुझ्या प्रणयाची झाली मज बाधा|
करुनी मनधरणी तुज लावीन लाडीगोडी ||१||
तुझ्या प्रितीचं गुलाबी सपान पाहिलं |
विरहाने तप्त होई माझी मनकाहिल |
प्रपंच मार्गी सवार होऊनी पळवू या घोडी ||२||
तु भासते मजला चंद्राची कोर |
मी तुझाच ग तहानला चकोर |
तुला नेसवीन ग इचलकरंजी साडी ||३||
मनमोर थुईथुई नाचतोय ग |
तुझा दुरावा माझ्या मनी जाचतोय ग|
"चित्त विसरले चिंतनाला" तुझी लागतां गोडी ||४||
तुला विमानाची सैर करविन ग |
मोत्याचा घास तुला भरविन ग |
तुझ्या गळ्यात घालीन सोन्याची मंगळसुत्र जोडी||५||
मोका साधुन शुभ मंगल करु |
दोघांनी मिळून कृष्णगुरुंच पुजन करु|
समाधानाने चाखुया ग भव मायेची गोडी ||६||
*** *** *** *** ***
# (स्वरचित)