?⚘⚘???॥रामकृष्णहरि॥???⚘⚘?
लोकांना आदल्या दिवशी वाढदिवस साजरा करायचं सामान आणायला लावून ‘उद्या माझा वाढदिवस जंगी साजरा करा’ असं म्हणत वाढदिवस साजरा करून घेणं सोपं आहे. यात काहीही भलं नाही. लोकांनी हुन साजरा करण्यात खरं भलं आहे.
तुकाराम महाराज म्हणतात, मी सामाजिक कार्यकर्ता आहे, मी धार्मिक माणूस-बैरागी वगैरे आहे, हे लोकांना सांगून, “माझा गौरव करा म्हणून ‘लोकांकडून मान मिळवण्यापूरतं’ ठीक आहे. पण यात स्वतःचं भलं काय झालं ? तुम्हाला भलं करून घ्यायचं असेल, खरं ‘फळ’ मिळवायचं असेल, तर मग ‘खऱ्यानं वागणे’ एवढंच करावं लागेल.”
नुसतं खऱ्यानं वागले, तरी लोक तुम्हाला डोक्यावर घेतील. त्यांना तुम्ही ‘डोक्यावर घ्या’ म्हणण्याची गरज पडणार नाही.
“मिळालेल्याच्या आनंदापेक्षाही मिळालेलं जपून ठेवण्यात जास्त कष्ट असतात. जसं पोट, जास्त खाल्लं म्हणून एवढं दुखणार नाही, जेवढं अपचन होऊन उलटी झाल्यावर दुखेल.” लोकांकडून स्वतःचा गौरव करून घेणं हे असं अवघड आणि अपचन होईल असं असतं. म्हणून, हुन सत्कार झाला तर ठीक, नसता सत्कार होण्याची अपेक्षा कराल, तर भंग होऊन जास्त त्रास होईल.
“निर्जन ठिकाणी चोर मागे लागले म्हणून जिवाच्या आकांतानं पळत-पळत गावच्या शिवेपर्यंत यायचं आणि एवढं जवळ येऊन, पळून ‘धाप’ लागल्या कारणानं मरायचं! जीव जातानाचा त्रास तर झालाच, पण पळाल्याचाही त्रास झालाच.”* पळून काय उपयोग झाला? काही भलं झालं नाही. त्याप्रमाणं, मान मिळावा म्हणून प्रयत्न केले तो त्रास वेगळा, आणि एवढं करूनही कुणी मान दिलाच नाही, तर हाही त्रास वेगळाच.
मूर्ख लोकांना घरात, गल्लीत, गावात “शूर असल्याचा आव आणायला गोड वाटतं. आणि खरंच युद्धाला जायची वेळ आली की मग अवघड वाटतं.” तसं, मी मोठा आहे म्हणणं सोपं आहे, पण मोठ्याचं वागणं अवघड असतं. बोलून नव्हे तर वागून मोठा असल्याचं सिद्ध करून दाखवता आलं पाहिजे......
?? रामकृष्णहरि⚘रामकृष्णहरि⚘रामकृष्णहरि??
??⚘??⚘??⚘??⚘??⚘??