मनी ग मनी
मनी ग मनी कुठून ग आलीस
आमच्या घरचा सदस्य बनलीस!
दूध पितेस पोळी खातेस
आमच्या अंगावर उड्या मारतेस!
दिवसभर  तू कोठे ग भटकतेस
भूक लागली की  कशी धावत येतेस!
लळा लावलास किती आम्हास
वाट पाहतो तुझी क्षणाक्षणास!
इवली इवली पिल्ले घेऊन येतेस
मनोरंजन आमचे करून जातेस!
जिन्याखाली  कायम बसून राहतेस
तिथेच पिलांना ऊब शोधत असतेस!
दिलेल्या अन्नाला कायम जागतेस
रात्रंदिवस न थकता पहारा करतेस!!
प्रदीप गजानन जोशी
विटा ( जि. सांगली)
मोबा 9881157709

Marathi Poem by Pradip gajanan joshi : 111164308
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now