#kavyotsav2
"ती"
स्थिरावली ही नजर तुझ्यावर,
अजूनही येईना मी भानावर.
सुंदरश्या कोवळ्या चेहऱ्यावर,
केसाची बट पडती गालावर.
इरून फिरून विषय येतो प्रेमावर,
तुझेच नाव येती ओठांवर.
कधी येशील धुंद किनाऱ्यावर,
टिकून आहे डोळा त्या वाटेवर.
विश्वास आहे माझ्या हृदयावर,
करेल प्रेम त्या फुलत्या कळीवर.
-स्नेहा