थो....डस जग जिंकूया
आज पूर्ण विश्व, जिंकायची च गोष्ट करतंय
जीन्कालेल्यांची पण गोष्ट करतंय ;
आपण पण तेच करत राह्यलोय, नाही !
चल न गडे आपली पण गोष्ट आईकुया |
चल न गडे थो....डस जग जिंकूया ||
तुला आस वाटतंय कि तुझी स्वतंत्र्यता हरवली?
तुला आस वाटतंय कि तू तुझी पांख कुठेतरी घालवली?
आकाश अझुनही तुझं आहे ,
फक्त तला एक उडान भरायची आहे;
चल न गडे आपली घालवलेली एक पांख घडवूया|
चल न गडे थो....डस जग जिंकूया ||
फूल कधी कोणाचं नसतं,
जेनी घेतल तेच च असतं,
पण जेनी फेकलं तेच पण;
चगदुनही ते सुवास देतं
मला पण तसं महेकता येत;
चल न गडे थो....डस महेकुया |
चल न गडे थो...डस जग जिंकूया ||
माझं दार मला नाई सापडत ,
तुझं दार सापडलं तरी ते तुझं नाई वाटत;
ते दार उघडायच कसलं,
जे आपलं नसलं,
चल न गडे एक आपलं पण दार बनवूया|
चल न गडे थो...डस जग जिंकूया ||
कुठेतरी आपण च चूकतोय;
कुठे चूक राह्यली ती मी पण शोधतोय;
चल न गडे थोडासा मनाचा आभ्यास करूया|
चल न गडे आपली पण चूक शोधूया|
चल न गडे थो...डस जग जिंकूया ||
मनुष्याची गणतरी कशी असते ती मला नाई माहित;
माझी गणतरी कोणी कशी केली ती पण नाई माहित;
चल सोड हि गणतरी च;
चल न गडे एक स्वताहा च गणित केलावूया|
चल न गडे थो...डस जग जिंकूया ||
जीवन आणि मृत्यू हा तर नियम च राह्यला,
पण प्रत्येक माणूस एक आठवण म्हणून राह्यला;
मी पण कधी तरी जाणार,
तू पण कधी तरी जाणार ;
चल न गडे थो...डीशी आठवण सोडून जाऊया|
चल न गडे थो...डस ,पण जग जिंकूया ||
-ऋत्विक वाडकर
(Lets win the world)
#KAVYOTSAV -2