सद्गुरू म्हणजे मूर्तिमंत पावित्र्य..
*सद्गुरू हे आतून-बाहेरून इतके शुध्द आणि पवित्र असतात की त्यानीं काही दिलं नाही, बोलले नाही, उपदेश केला नाही, चमत्कार केला नाही, तरी त्यांच्या देहातून-मनातून ज्या पवित्र लहरी वा स्पंदने बाहेर पडत असतात, त्यांनी आसपासचं वातावरण पवित्र झालेलं असतं. अशा वातावरणात राहिल्यानं आपल्याही मनात पवित्र विचार येऊ लागतात. त्याचा परिणाम आपली बुद्धी व प्राक्तन यावरही होतो. म्हणूनच म्हणतात, न लगे मुक्ती,धन,संपदा! संत संग देई सदा.
ईश्वर ही अनुभूतीची गोष्ट...
आम्ही ईश्वर मानीत नाही,पण सदाचरणाने वागतो, असे म्हणणारेही कुणीकुणी आहेत. ईश्वर मानित नाही, पण सदाचाराने वागतो म्हणजे काय? आम्ही संविधान मान्य करीत नाही, पण न्यायाने वागतो असे म्हणण्यासारखे आहे. न्यायाचे अधिष्ठानच संविधान आहे. तसेच सदाचरणाचे अधिष्ठान ईश्वर आहे. आपण आपल्या मनासारखे झाले की त्यांची कृपा झाली म्हणतो आणि मनाविरूद्ध झाले की कृपा नाही म्हणतो ते चुकीचे आहे. आपल्याला वाटते तसे न होण्यातही त्यांची कृपाच आहे. झोपल्यावर रोज सकाळी आपण जागे होतो ही त्यांची कृपाच नाही का?
0 मच्छिंद्र माळु औरंगाबाद 0