पण तो मनातल्या मनात म्हणत असे...
माझे चांगले होईल
पण जेव्हा तू माझ्या सोबत असशील"
करण तो तिला दुखी पाहू शकत नव्हता....
तिला समजुनंच घ्यायच नव्हत कि तो निष्पाप तिच्या वर प्रेम करायचा
त्याच्या मनात एक अशा होती कधी तरी ती त्याचा विचार करेल,
कधी तरी तिला त्याच्या भावना समजतील..
त्याला नेहमी वाटायचं
आज न उद्या तिला माझ प्रेम कळेल..........
असेच एक वर्ष निघून जात तो अजूनही तिला तसेच -sms करत होता..
आता कॉल कमीवजा बंदच झाले होते
तो तीची वाट पाहत होता पण ती त्याला अव्हाॅईड करत होती
त्याच्या मनात कुठेतरी आशेचा किरण लुकलुकत होता
कि ती पण त्याच्यावर प्रेम करेल
पण............
त्याच्या mobile वर call तर येतच नव्हते आणि आता msg पण बंद झाले होते........
त्यामुळे त्याला एकटं वाटायला लागलं असेच तिच्या विचारात तो जास्तच अस्वस्थ राहायला लागला.
त्याच आता कामात लक्ष पण लागत नव्हतं
असंच तो त्याच्या रोजच्या कामात असतो
15 तास नॉनस्टॉप गाडी ड्राईव्ह करून पण तिचा विचार डोक्यातुन जात नव्हते
तेवढ्यात अचानक धडाड् मोठ्याने आवाज होतो सर्व चेहरा रक्ताने लाल होउन जातो आणि चेतावनी फलकावर ची ओळ सार्थक होते........
"लक्ष विचलित अपघात निश्चित"
What'sUp FB ला फोटो शेअर होतात!
अचानक इतक्या दिवसांनी
खास तिच्या काॅल साठी सेट केलेली रिंगटोन
soniye - hiriye....... ऐकु येते
आणि अवघ्या काही तासांपुर्वी झालेल्या अपघाताची ग्लानी विसरून क्षणात फोन उचलला जातो आणि कित्येक दिवसांपासून न ऐकलेला आवाज ऐकू येतो त्यात जवळजवळ हुंदका दाबून काळजी वजा दटावणीच्या सुरात जवळपास ती ओरडतेच.........
लक्ष कुठे होतं तुझं? तु का असं करतोय रे? फक्त आणि फक्त प्रश्नांना भडीमारचं!!!
"तुला काय झालं असतं तर तुझ्या मम्मी पप्पा ने कसं जगायचं होतं?
फक्त मैत्री आहे या भावनेने मला तुझी काळजी वाटते, बस्स
त्याच्या पायाखालची जमीनच सरकते तो स्तब्ध होतो.
पायात 8 टाके दिलेले पायातून रक्त वाहत होत एवढ्या जीवघेण्या अपघातातुन बाहेर पडलेला पण त्याच दुःख ही तिच्या अश्या बोलण्यापुढं अधिक त्रासदायक वाटलं.
तो स्वतःच्या मनाला समजावण्याचा अयशस्वी प्रयत्न करतो.
पण त्याच हृदय गाडीच्या विन्डशिल्ड प्रमाणेच तुटून इतरत्र विखरतं......
तसाच जाऊन तो अपघातग्रस्त गाडीजवळ बसतो
आणि सहजच त्या निर्जीव पण एखाद्या प्राणप्रिय मित्रा सारखं गाडी ला बोलतो... तु माझ्या जिवावर आलेल स्वतः वर ओढून घेतलं न स्वतः चुर झालीस मला त्याचा त्रास झाला, तुला मी धन्यवाद दिला तु कृतार्थ झाली पण माझं मन कोणी तरी खोलवर दुःख दिल
मी जगलो म्हणुन हसू कि जगुन पण दुःखी झालो म्हणून रडु!
कोणाला दुःखात आलेले डोळ्यातले अश्रू दिसू नये म्हणून तो पावसात भिजून आपले अश्रू लपवतो.
त्यानंतर 3 रात्री त्याला झोप लागली नाही...
नंतर तो तिला call करते डोळ्यातले अश्रू गिळून तीला बोलतो..
"ह्या पुढे मला कोणत्या हि प्रकारचा contact करू नकोस.."
ती पार गोंधळून गेली होती, आपला एक शब्द ऐकण्यासाठी आसुसलेला हा अचानक असा काय बोलत आहे म्हणून,
"अरे काय झाल.."
तो"तू खूप काही गोष्टी माझ्यापासून लपवल्या आहेस.."
तिला त्याच्या बोलण्याचा अर्थ कळतो परत ती त्याला बोलते..
"तुला माहित आहे का मी तुझ्यावर किती प्रेम करते.."पण मित्र म्हणून
तो म्हणतो
"हो मला माहित आहे.."
ती"मला माहीत आहे तू माझ्यावर प्रेम करतोस,
आणि मी हि तुझ्यावर प्रेम करते..
पण ते कधी पूर्ण होऊ शकत नाही आणि कधी व्यक्त हि..
मला तुला फसवायचं नव्हत आणि मला तसे करता हि आले असते,