रूक्ष साऱ्या आकांक्षा
एकदा अशाच समाजाने
वाळीत टाकलेल्या स्त्री
सोबत भेट झाली...
कंबरेला खोचलेला पदर तिचा
गालाला लावलेली लाली
काजळ माखलेल्या डोळ्यात तिच्या
उद्याची स्वप्ने रंगवलेली होती पण ,
स्वप्ने ती जळून राख झाली...
लाल गर्द लिपिस्टिक लावलेल्या
कापर्या ओठांनी काळीज चिरून
घेणारे शब्द तिचे बाहेर पडत होते...
रोज भोगणारे भोगतात म्हणे
नश्वर देह्याची ह्या चव ;
कधी उंचभ्रू नवाजलेली
शोकीन येतात वस्तीत आमच्या
अन् पैशाच्या बाजारात चढवतात
बोहल्यावर आम्हाला ...
अंधारलेल्या काळोखापरी जीवन
झाले भकास ताई तुम्ही सांगा म्हणे ,
आमचा धंदा झाला बंद तर तरूणी
स्त्रीया राहिल का सुरक्षित ह्या देशात ???
की वासनेने बरबटलेले हे जनावर
करेल तिचा घात जीव घुटमळतो
म्हणे ह्या चार भितीच्या आत ...
करा आमच्यासाठी काहीबायी
नाहीतर तुमचा हा स्त्री जन्म असा
फुकट वाया जायी...
मला जागा ठेवणारा तिचा श्वासही
वेशा वस्तीसाठी क्षणक्षण झुरतो अन्
लढतो कुठल्याही ऋतुमानात
तिला हवा तसा दिवस यावा म्हणून ....
पण, वासनेचा अंत होतो कुठे ??
पेटत्या अग्नी ज्वाले सोबत वासना ही
जळली तर ....
तुला सांगते ,
भिजल्या पापण्यांनी पाहू स्त्रीला स्वतंत्र्य
मिळाल्याचे सोहळे ....
रूक्ष साऱ्या आकांक्षा अन् भेदणाऱ्या
कर्णाला आर्त आजर्वी हाकांच्या मागण्या ...
© कोमल प्रकाश मानकर
विजय कॉलनी ,सिंन्दी रेल्वे ,वर्धा