*शिर्षक - भार संसाराचा .*
लग्न बाहुला - बाहुलीचे
आम्ही कित्येकदा लावले
आता स्वतः हा सासरी जाताना
मात्र अश्रु डोळ्यात का दाटले...?
खेळ भांड्या - भांड्याचे
तेव्हा कित्येकदा मांडले
आता मात्र संसाराच्या पसाऱ्यात
मी एवढी का आडून पडले.. ?
लंगडी - लंगडीचा खेळ तेव्हा
तासोनं तास खेळला
शरीराचा भार सारा
एका पायावर तोलला.. ?
तेव्हाचा तो विश्वास
आता कुठे मुरला
नात्यांचा हा भार सारा
आता का बर नाही पेलला.. ?.
बारीक बारीक हातांनी
भाकरी तर मी तेव्हासुद्धा थापल्या
त्या मातीच्या भाकरींना मात्र
दगडाच्या विस्तवावर भाजल्या..!
आता भोवतालच्या या सम्राटांच्या
रोज चुकाच का मी शोधल्या
सुखाबरोबर दुखाच्याही झळया
का बरं मी नाही सोसल्या..?