फार काही नाही पण रोज काहीतरी नवीन शिकायचयं
आयुष्याचा विद्यार्थी म्हणुनच मला जगायचयं..
माझ्यातील चुका शोधुन
मला रोज नव्याने चांगला माणूस व्हायचयं..
जे मला मिळालं नाही ते इतरांना मिळावं
यासाठी प्रयत्न करु शकेल इतकं निस्वार्थी व्हायचयं..
अपयशानंतर येणाऱ्या भयाण राञीच्या काळोखाला
आरपार चिरुन, सार्या जगाला प्रकाशमान करणारा सूर्य मला व्हायचयं..
एक एक पाऊल टाकत..मला क्षितीजावर पोहचायचयं
फार काही नाही पण रोज काहीतरी नवीन शिकायचयं..
आयुष्यावर भरभरुन प्रेम करायचयं..
- साधना वालचंद कस्पटे ©?