Quotes by Prof Shriram V Kale in Bitesapp read free

Prof Shriram V  Kale

Prof Shriram V Kale Matrubharti Verified

@ysnyrsno2175.mb
(70.8k)

दिनांक ०२/१०/२०२५ रोजी ई साहित्य प्रतिष्ठान वर प्रा. श्रीराम काळे यांचा*टुरिंग टॉकीज*कथासंग्रह
लेखक प्रा. श्रीराम काळे यांचा टुरिंग टॉकीज म्हणजे कोकणच्या सुंदर पार्श्वभूमीवरच्या मजेदार कथांचा संग्रह. हा कथासंग्रह म्हणजे कोकणातील परंपरांचा सुगंध आणि आजच्या काळाशी जोडणारा पूल आहे. या कथा कदाचित एखाद्या वाड्याच्या ओसरीवर, वडाच्या झाडाखाली किंवा गावच्या चौकात संध्याकाळच्या गप्पांमध्ये सांगितल्या गेल्या असतील; पण त्यांचा भावविश्वावरचा परिणाम खोलवर रुजलेला आहे. कारण काळ बदलला तरी मानवी मनातील भावना, विचार आणि वृत्ती कायम तशाच राहतात.
या कथासंग्रहात लेखकाने कोकणातील प्रथा, परंपरा, समजुती, हेवेदावे आणि त्यातून निर्माण झालेल्या गावोगावच्या आख्यायिकांना शब्दांत गुंफलं आहे. एका लग्नाची गोष्ट, पडपड आंब्या, टूरिंग टॉकीज, देवाचं देवपण, थंड झाल्यार खावचा, दातारांचा त्रिपुर आणि लिंग्या गुरुवाला लॉटरी लागली या सात कथा कोकणच्या साध्या पण गहिऱ्या अनुभवांना शब्दरूप देतात. जसं टूरिंग टॉकीज गावोगाव फिरत चित्रपट दाखवायचं, तसंच या कथा कोकणातील आठवणी, नाती, सवयी आणि चमत्कारांच्या कथांनी आपल्या मनापर्यंत पोहोचतात.
कोकण ही फक्त निसर्गसौंदर्याची भूमी नाही; इथल्या समुद्रकाठच्या वाऱ्यांत, लाटांच्या गाजेत, भातशेतीच्या मातीच्या सुगंधात आणि डोंगरदऱ्यांतून वाहणाऱ्या ओढ्यांत एक सातत्यपूर्ण अनुभव दडलेला आहे. या अनुभवात कोकणच्या बोलीचा गोडवा, माणसांचं रोजचं जगणं, त्यांच्या श्रद्धा-समज आणि त्यांच्या भोवतालचं गूढविश्व सामावलेलं आहे. टूरिंग टॉकीज हा कथासंग्रह म्हणजे या अनुभवांचा जिवंत दस्तऐवज आहे.
सुनिळ सामंत (ई साहित्य प्रतिष्ठान)

Read More

आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत भाग्याचा आहे. माझ्या कथा डाऊनलोड करणारांची संख्या २
लाख पूर्ण होत आहे.
रसिक वाचकाना मन:पूर्वक धन्यवाद!

Read More

मातृभारतीवर धारावाही रूपाने प्रसिध्द झालेली मालिका आज साहित्य प्रतिष्ठान मार्फत ई बुक रूपाने प्रकाशित होत आहे

Read More

आज दिनांक १० में २०२५ ....
ट्रेडिंग लेखक यादीत माझं नाव प्रथम क्रमांकावर घोषित करण्यात आल. मातृभारतीने माझ्या लेखन सेवेचा केलेला हा सर्वोत्तम सन्मान आहे. संयोजकांना मन:पूर्वक धन्यवाद!

Read More

आज डाऊन लोड करणार्‍या वाचकांची संख्या १लाख पार झाली. मला प्रेरणा, प्रोत्साहन देणारे समग्र वाचक, आणि हे व्यासपीठ उपलब्ध करून देणारे मातृभारतीचे ऍडमिशन सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद! हे प्रेम असेच वृध्दिंगत होवो!
लेखक-प्रा. श्रीराम काळे

Read More

२९डिसेंबर२०२४ला आठ लघुकथा असलेला माझा कथासंग्रह "वसतीची गाडी" ई साहित्य प्रतिष्ठान वर प्रसिध्द झाला.

ई साहित्यवर आज बॅड कमांड हा प्रा. श्रीराम काळे लिखित कथासंग्रह प्रकाशित होत आहे. देवगड येथील काळेंच्या कथांना बहुतांशी कोकणची ग्रामीण पार्श्वभूमी लाभलेली असते. त्या पार्श्वभूमीमधे कोकणचे निसर्ग सौंदर्य तर असतेच पण तिथल्या लोकांचा निर्भीड, स्पष्टवक्ता स्वभाव आणि त्याला हापूसचा गोडवा याचीही साथ असते.
बॅड कमांड हा काहीशा बोल्ड कथांचा संग्रह आहे. माणसांच्या परस्परसंबंधांतील न बोलल्या जाणार्‍या पण कायम तरळत असणार्‍या वासनांचा या कथांवर प्रभाव आहे. समाजातील व्यंग अचूक पकडून त्यावर प्रकाश टाकणाऱ्या चटकदार कथा या संग्रहात आहेत.
- सुनीळ सामंत, ई साहित्य प्रतिष्ठान

www. e sahitya .com वरून मोफत डाऊन लोड करा.

Read More