Quotes by vishal g in Bitesapp read free

vishal g

vishal g

@vishalg3256


#KAVYOTSAV -2

मी तुझ्यावर किती प्रेम करायचो...!

तेव्हा मी कधीतरी कॉलेजला यायचो
हुशार म्हणून घरीच अभ्यास करायचो
मग जेव्हा तू मला दिसलीस
क्षणभर गालात काय हसलीस
तेव्हापासून फक्त तुलाच पाहायचो
तुझीच सगळी चित्रे मनात साठवायचो
एवढं एकच काम मन लावून करायचो
तुझ्या हसण्यात सार दुःख विसरायचो
कसं सांगू तुला मी तुझ्यावर किती प्रेम करायचो


भेट पहिली तुझी माझी तू वर्गात चालली होतीस
जवळ असून सुद्धा एक सुंदर स्वप्न वाटली होतीस
बघून तुला मी तेव्हा अगदी थक्क झालो
तुझ्याकडे तसाच एकटक पाहत राहिलो
जवळून जाताना तू माझ्या गुपचूप उभा होतो
शेजारी आल्यावर मात्र मी तुला सुंदर म्हणालो होतो
मला कळलंच नाही की मी कशाने बावरलो होतो
पण तू बघशील म्हणून लगेच सावरलो होतो
तुला काय तेव्हा मागं वळून पाहता आलं नाही
अन जेव्हा पाहिलस मला कशाचंच भान उरलं नाही
मग मी सारखाच तुझ्या नजरेला माझी नजर द्यायचो
कसं सांगू तुला मी तुझ्यावर किती प्रेम करायचो

एक महिना संपला तू जरा जास्तच पाहायला लागलीस
मनाला वाटलं माझ्या प्रेमाला जागलीस
ना मला होश राहिला ना तू शुद्धीत राहिलीस
माझं प्रेम जेव्हा तू जगायला लागलीस
मी तर दिवस रात्र तुझ्या प्रेमात असायचो
तुझ्याच आठवणीत तासन तास रमायचो
कष्टाचं काम असलं तरी हसत हसत करायचो
तेव्हा सुद्धा डोळ्यांपुढं फक्त तुलाच आणायचो
कसं सांगू तुला मी तुझ्यावर किती प्रेम करायचो

माझं प्रेम जेव्हा तुला कळलं
तुझं ही मन माझ्याकडे वळलं
तेव्हा तू इशाऱ्याने प्रतिसाद द्यायला लागलीस
कधी पाहायला तर कधी हसायला लागलीस
कधी तर परक्या सारखी सुद्धा वागलीस
एकदाच माझ्याकडे पाहून दोनदा लाजलीस
चातकासारखा मी तुझ्या वाटेल डोळे लावायचो
तुझ्या लाखो अदांवर सदा फिदा होऊन जायचो
कसं सांगू तुला मी तुझ्यावर किती प्रेम करायचो

अशीच सलग दोन वर्षे निघून गेली
ना तू मला विचारलं ना मी तुला
नजरेने एकमेकांशी खूप बोललो
समोर भेटायची हिम्मत नाही झाली मला
कारण तेव्हा तुझं शिक्षण अंतिम टप्प्यात होतं
आणि मला तुझ्या शिक्षणातला दगड व्हायचं नव्हतं
एके दिवशी तर थांबवून तूच मला विचारलं
तुझ्या शिक्षणासाठी मी नाही म्हंटल
पण तुला ते कधीच कळलं नाही
अन तुला समजावणं मला जमलं नाही
अगं तुझ्या अभ्यासाची पण काळजी करत असायचो
कसं सांगू तुला मी तुझ्यावर किती प्रेम करायचो

तुझ्यासाठी खूप बदललं मी स्वतःला
तुला जिंकायची आस नाही क्रेझ होती मला
मी चार महिने तुझ्यापासून दूर काय झालो
तू तर दुसरा पहिला...मी मात्र एकटाच राहिलो
जाऊदे...सारं झालं गेलं म्हणून सारखं आठवून विसरायचो
आठवून तुझा चेहरा रोज रात्री रडायचो
चेहऱ्यावरचं दुःख मोठ्या हिमतीने लपवायचो
विचारलं कुणी कसं काय तर मजेत म्हणून सांगायचो
कसं सांगू तुला मी तुझ्यावर किती प्रेम करायचो

आता तर म्हणे तू लग्न केलंस
पण जे केलंस ते चांगलं नाही केलंस
तू थोडं तरी थांबायला हवं होतं
मी सुद्धा माझं करिअर घडवलं होतं
आता... तुझी आठवण येऊ नये एवढंच देवाला सांगायचंय
इथून पुढं फक्त चांगलं आणि चांगलंच वागायचंय

बेटर लक नेक्स्ट टाईम म्हणून आता शिकलोय गप्प राहायला
प्रेम वेड्या जखमी मनाची समजूत काढायला
असेल देव जगात तर एकच मागणं देवाला
पुढच्या जन्मी फक्त माझ्यासाठी बनवावं तुला
नाहीतर हा माणूस जन्मच नको मला
नाहीतर हा माणूस जन्मच नको मला...!

Read More

इस दुनिया में

आपला माणूस अन त्याची प्रवृत्ती

नाय.. No....Never
कधीच नाही

जरा आपण दुष्काळ पेलू...!