Quotes by mr swahit words official in Bitesapp read free

mr swahit words official

mr swahit words official

@swahitkalambate627092


का जीवन संपवतात..?

लोक म्हणतात प्रेमात हरलो तर आयुष्य संपतं,
तिच्याविना जगणं म्हणजे श्वासही थांबतं.
पण जरा विचार करा शांत बसून क्षणभर,
जगात किती जण जगतात अंधारात अखंडभर.

ज्यांना दिसत नाही हे रंगीत जग सारे ,
तरीही ते हसतात, जगयाला आशेचे सहारे.
त्यांना नाही दिसत सूर्य, नाही चंद्र, नाही तारे,
तरीही स्वप्न पाहतात मनात हजार किती सारे.

मग आपण का म्हणतो प्रेम गेलं तर जीवन संपलं?
एक व्यक्ती गेली म्हणून सगळं जगच थांबल?
प्रेम सुंदर आहे, पण आयुष्य त्याहून मोठं,
स्वतःवर विश्वास असेल तर दुःखही होतं छोटं.

जगणं म्हणजे फक्त कोणावर प्रेम करणं नाही,
स्वप्नं, ध्येय, माणसं — आयुष्याची ही गोष्टच वेगळी काही.
आंधळे लोकही जगतात धैर्याने रोज,
मग आपण का हार मानायची प्रेमाचे घेऊन ओझं?

विचार :
प्रेम हरलं म्हणून आयुष्य हरत नाही,
कारण जगणं एका व्यक्तीवर कधीच अवलंबून राहत नाही..

Read More