Quotes by Shalaka Bhojane in Bitesapp read free

Shalaka Bhojane

Shalaka Bhojane

@shalakabhojane130053
(94)

आला मे महिना माहेरी आल्या सगळ्या जणी
वेळात वेळ काढून भेटल्या जुन्या मैत्रीणी
जुन्या आठवणींची पुन्हा एकदा झाली उजळणी
जाताना घेऊन गेल्या नवीन आठवणींची शिदोरी

-Shalaka Bhojane

Read More

पुरुष तो पुरुष च असतो

आभाळाएवढे दुख एकटा सहन करत असतो

सगळ्यांचे हट्ट तो आपल्या परीने पूर्ण करत असतो.

भाऊ बनून बहिणीचे रक्षण करत असतो

मुलगा बनून आई बापाची सेवा करत असतो

बाप बनून मुलांची काळजी करत असतो.

मामा बनून भाच्यांचे लाड पुरवत असतो

काका बनून पुतण्यां बरोबर खेळत असतो.

कधी कधी आपल्या ला तो खडूस वाटत असतो

पण मनातून तो सगळ्यांची काळजी करत असतो

स्वतः च्या हौसेला तो वेळोवेळी मुरड घालत असतो

सगळ्यांचे लाड तो मोठ्या हौसेने पुरवत असतो.

आपल्या वर संकट आलं की ढाल बनून उभा असतो

लेकीच्या लग्नात मात्र अश्रू लपवत रडत असतो.

आपण सगळे जण त्याला बाप म्हणून ओळखत असतो

कितीतरी संकटांशी तो एकटाच लढत असतो

सगळी वादळं तो मनामध्ये दडवत असतो.

सगळ्यांना खूष ठेवण्यासाठी तो रात्र दिवस कष्ट करत असतो.

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक सुपरहिरो असतो.

पण आपण मात्र सुपरहिरो पिक्चर मध्ये शोधत असतो.

पुरुष तो पुरुष च असतो.

Read More

चेहरा आपका देखकर आखोको ठंडक सी मिलती है
इस भीड भरी दुनिया में कोई अपना भी है यह राहत सी मिलती है.