Quotes by Santosh Udmale in Bitesapp read free

Santosh Udmale

Santosh Udmale

@santoshudmale7619


आणि तीला पाळी आली

आज जवळ जवळ पंधरा दिवस पायी चालंत ती. जत्रेत आली. पाच पन्नास लोकं होती म्हणा तीच्या बरोबर. दर वर्षी त्यांची पायी वारी यायची. पण या वेळी तीचं मनच लागत नव्हतं. कारण तीचं महन्याचं सुरू होणार होतं. म्हणजे चार दिवस आता ती बाहेरची. देवस्थान खुप कडंक. या देवाला बाहेरचा वारा ही चालत नाही. त्यात जर पाळी आली आणी शीवाशीव झाली तर देवाचा कोप .. वीचारानंच कापर भरंलं तीला. कसंही करून एकदाचं दर्शन होऊ दे, मग पाळी येऊ दे. मनोमन तीनं देवाला प्रार्थना केली.
आता नदिवर दर्शनासाठी स्नान सुरू झाले खरे.. याच नदिवरून देवाला ही स्नानासाठी देवाचा गुरव हंडा भरून पाणी न्यायचा.
भक्ती भावाने ती ही नदित स्नानासाठी उतरली. आणी ते चार दिवस सुरू झाले तीचे......  याची चाहुल लागली .....  पाळी आली पण काय करणार.... तिच्या हातात थोडीच काय होते..... . निसर्ग तर त्याचे काम करत होता.....  जवळपास कोणतीच सुविधा नव्हती...... जणु खुप मोठा अपराध घडला आपल्या हातुन....  . ती अशीच भिरभिरल्यासारखं आजुबाजुला पाहु लागली......  आणी तीची पाळी नदित  एकरूप झाली..... देवाच्या नदि ने ही धुतली बाई.....  कोणत्याही आक्षेपा शिवाय... तिच्या डोहात.... ... ही डोळ्यातले आश्रु डोळ्यातल्या डोळ्यात लपवत हादरून गेली..... ...  तेवढ्यात देवाचा गुरव आला हातात कळशी घेऊन... ..... पाणी भरले अंघोळीला देवाच्या.....

आणी जाताना त्याने  जोरात आरोळी दिली....

बाजुला सरका, तुमच्या सावलीनं विटाळ होईल देवाला....

Read More