Quotes by Sandhyarani oulkar in Bitesapp read free

Sandhyarani oulkar

Sandhyarani oulkar

@sandhyaranioulkar1507


मला बाकी आयुष्यात् काहि नकोय रे फक्त मला जस वाटतंय तस तुला ही कधीतर वाटू देत ......
खूप बोलावंसं वाटतय तुझ्याशी तुला ही अस कधितर ते वाटू देत.....
मला तुला अर्जंट भेटायचंय असं तुला ही कधीतरी वाटू देत.....
घट्ट मिठी माराविशी वाटते तुला असं तुला ही कधी तर ते वाटू देत ....
तुझ्या मांडीवर डोकं ठेउन शांत झोपायचय ते तूला अस ही कधी तर वाटू देत...
तुझ्याशी बोलले नाही की बैचेन होते तस तुला ही कधीतरी वाटू देत....
तू नजरेआड झालास की बैचेन वाटतं अस तुला ही कधीतरी वाटू देत....
लहान मुलासारखे हसायच्य बागडायचय मस्ती करायचीय खूप तुझ्यासोबत अस तुला ही कधी तर वाटू देत....
तुझ्यासोबत असलो की खूप छान वाटतं अस तुला ही कधीतर वाटू देत...
तुझ्यासोबत आयुष्य खूप छान सिक्युअर वाटतंय अस तुला ही कधीतरी वाटू देत ..
मी जशी भांडते आपल्या नात्यासाठी कधीतरी तू भांड ना रे माझ्यासाठी...
तुझ्याकडून नेहमी वेळ मागते माझ्यासाठी तुला ही कधीतरी तो वेळ मिळू देत.....
खुप उणीव भासते रे तुझी नेहमीच माझी थोडी तर उणिव तुला भासू देत....
खुप मिस करते रे मी तुला तुला ही कधीतरी माझी आठवण येऊ देत.........
खुप सवय झाले रे तुझ्या सहवासाची तुला पण थोडी माझी सवय होऊ देत... फक्तं एवढच हवय मला......
खूप हरले रे आता या सगळ्या गोष्टी फक्त मला एकटीला च हव्यात अशा वाटायल्यात रे आता .......

Read More