Quotes by praju in Bitesapp read free

praju

praju

@praju4609


एक रात्र आणि...
असंख्य विचार


मोबाईल पाहत असताना अचानक घड्याळाकडे लक्ष गेलं — रात्रीचा एक वाजला होता. अचानक डोक्यात आणि मनात अंधार पसरला. या वेळेस सगळं जग गाढ झोपेत असेल.
पण सगळेच झोपले असतील का?
मग मी अजून कशी जागी आहे?

माझ्या सारखं काही लोक अजून जागे असतील, जे उघड्या विचारांच्या खोल गर्तेत अडकले असतील. इतके की काहीच वाटेनासं झालं असेल, की यातून आपण कधी वरच येऊ शकणार नाही.

काहींना असंही वाटत असेल की — नाही, आता पुरे झालं. खोल बुडालोय... पण परत यायचंय, जगायचंय.

मग या दोघांत मी कुठे आहे?
तेच कळत नाही.

विचारांची मालिका संपतच नाही. पडलेल्या प्रश्नांचं उत्तर शोधायचा प्रयत्न केला की, परत नवीन प्रश्न उभा राहतो.

आऊश्याच्या प्रश्नांत अडकून गेलं आहे मन.
करण्यासाठी खूप काही आहे, पण करायचं काय हेच कळत नाही.

सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना असं वाटतं, की आपण एकटेच आहोत.
कोणीच नाही आपल्याला, कोणीच नाही आपल्या जगात.

एकटेपणाची जाणीव होताच डोळे पाण्याने भरतात... कधी कधी हेच एकटेपण खूप जवळच वाटतं... पण कधी कधी तेचं एकटेपण खरंच आपल्याच एकटेपणाची जाणीव करून देतं. याचं एकटेपणात जीवनाची अनेक कोडी उलगडतात.
काही चित्रं स्पष्ट दिसू लागतात. केलेल्या चुकांची जाणीव होते.

आणि कदाचित, हेच एकटेपण आपल्याला अधिक स्पष्टतेने जगायला शिकवेल.
कधी एकटं वाटणं, पण खास असतं – एकाच क्षणी सगळं हरवलेलं आणि सगळं मिळवलेलं असतं.

Read More