Quotes by Nikita Ingole in Bitesapp read free

Nikita Ingole

Nikita Ingole

@nikitaingole755309


प्रेम म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल श्रद्धा आणि भक्ती...

माझं प्रेम तुझ्या विचारांवर, आणि तुझ्या चांगल्या स्वभावावर होतं,
हे तुला समजलं नाही...

कारण की, समजणाऱ्या व्यक्तीलाच समजते की,
प्रेम ही एक शुद्ध भावना आहे म्हणून...
पण, न समजणाऱ्या व्यक्तीला हेच वाटते,
प्रेम म्हणजे फक्त Timepass आहे म्हणून...

पण हे असं शुद्ध आणि निर्मळ मनाचं माझं प्रेम तुला आता काय कधीच समजलं सुद्धा नसतं....

कारण की, हे समजून घेण्यासाठी निर्मळ मन असलेलं हृदय पाहिजे असतं...
आणि ज्यांच्या जवळ असं हृदय असतं,
त्यांनाच समजते खरं निस्वार्थ प्रेम काय असतं म्हणून...

Read More

प्रेम हे प्रेम असते,

प्रेम म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल श्रद्धा आणि भक्ती...
माझं प्रेम त्या व्यक्तीला समजलं होतं, ज्या व्यक्तीशी मी निस्वार्थ प्रेम केलं...
पण त्या व्यक्तीने असं दाखवलं की,
माझं प्रेम त्या व्यक्तीला समजलं नाही म्हणून...

समजून घेतलं तरी सुद्धा न समजल्या सारखं दाखवलं,
माझं प्रेम तुझ्या विचारांवर, आणि तुझ्या चांगल्या स्वभावावर होतं,
हे तुला कधी समजलं सुद्धा नसतं...
आणि तू, जे समजलं त्याची समजूत काढण्यासाठी माझं प्रेम एवढं स्वार्थी सुद्धा नव्हतं...

समजणाऱ्या व्यक्तीला समजते की,
प्रेम ही एक शुद्ध भावना आहे म्हणून...
पण, न समजणाऱ्या व्यक्तीला हेच वाटते,
प्रेम म्हणजे फक्त Timepass आहे म्हणून...

माझ्या प्रेमाला तू कधीच समजून घेतलं नाहीस,
माझं प्रेम म्हणजे, तुझ्या आठवणीत हसत खेळत संपूर्ण आयुष्य जगणं होय...

☝️ हे असं शुद्ध आणि निर्मळ मनाचं माझं प्रेम तुला आता काय कधीच समजलं नसतं....


Writer _
एन. आर. इंगोले

Read More