Quotes by सौ. लीना देगलूरकर in Bitesapp read free

सौ. लीना देगलूरकर

सौ. लीना देगलूरकर

@leenadeglookar


थरार....


श्वासात चालू, थरार आहे
निघण्यास आत्मा, तयार आहे

निघते आताशा, इथून वसुधे
संपून गेला,करार आहे

सांगू कुणाला,व्यथा इथे मी
विश्वास झाला, फरार आहे

गाणार गाणे,इथे कसे मी?
तुटली मनाची, सतार आहे

लीनास दाखव,कधीतरी तू
हृदयावरी जो प्रहार आहे


सौ. लीना देगलूरकर
©7/8/2023

Read More