Quotes by Kiran in Bitesapp read free

Kiran

Kiran

@kiran9519


रात्रीच्या शांततेच्या पलीकडे
अगदी इवलीशी कल्पनेची वस्ती..

जग झुकलं जिच्यापुढे
इतकी विलक्षण तिची शक्ती..
©kd

Read More

जवळ केले कि जाणून दूर जातात ,
घरात घेतलं कि तेच गावाबाहेर काढतात,
.
प्रेम केले कि गेम करणारेच असतात,
निस्वार्थ जपले कि तेच स्वार्थ साधतात ,
.
कळत नाही नक्की मी का ते चुकतात .......???

Read More

हल्ली नवी कारणे झोपेला भेटलीत स्वप्नांची..
जवळ असूनही दूर तारांबळ अगदी मनाची..
.
समजूत घालत केवळ पाने पलटावीत कॅलेंडरची..
अखेरीला शेवट गोड वेळ हसऱ्या पहाटेची..
.
गंधित वारे अन सुप्त उधळण रंगांची..
चौफेर असतील मनोरे उंच मजल स्वप्नांची..
.
डोळे बंद तरी फित सुरूच आयुष्याची..
©
#kd

Read More

जगायाच तर अस जगा कि
कावळा पिंडाला शिवला नाही
लोळला पाहिजे..
.
.
#KD