Quotes by Jaie Naik in Bitesapp read free

Jaie Naik

Jaie Naik

@jaienaik1684
(6)

कधी असे व्हावे ,

समुद्र किनारा असावा , पौर्णिमेचा चंद्र असावा ,

आणि तू सोबत असावा.

कधी असे व्हावे ,

आभाळ भरून यावे , विजां सहित ढग बरसावे,

आणि हृदयातील धडधड तू ऐकावी .

कधी असे व्हावे

शांत गार वारा असावा ,

शेकोटीची ऊब असावी ,

आणि मी तुझ्या कुशीत असावे...

Read More

ढग , पाऊस ,

तू आणि मी.

सुगंध , ऋतू ,

तू आणि मी.

वाहती नदी झऱ्याचे पाणी , शांत समुद्र,

तू आणि मी.

डोळे , अश्रू ,

तू आणि मी.

सुख, समाधान,

तू आणि मी.

पहाटेच्या वेळी कोकिळेची कुहू,

कुशीत एकमेकांच्या , तू आणि मी.

Read More

तुझ्या ओठांनी तू,

माझ्या अंगावर अख्ख पुस्तक लिहिलेस ,

त्या प्रत्येक भागावर तु,

फक्त प्रेम लिहिलेस.

तुला वाटले

शब्द माझ्या अंगावरचे, मी कशी वाचणार ?

पण तू लिहिण्या आधीच,

स्पर्शुनी तुझ्या ओठांना,

वाचले होते सारे काही .....

Read More