Quotes by Harshal Kamdi in Bitesapp read free

Harshal Kamdi

Harshal Kamdi

@harshalkamdi090326


व्यसनांची वाढती फॅशन
(Screen Addiction)

"अभ्यासाचं ताण, त्यावर लक्षही लागत नाही, झोप येतेय.." असं जेव्हा एका मित्राला बोललो,
तेव्हा तो म्हणाला, "अरे! सिगारेट try करून बघ,
तुझ concentration वाढेल, जास्त वेळ अभ्यास होईल रात्री."
यावर मी काहीच बोलू शकलो नाही. व्यसन घेण्याचं तर दूर, मी हे घेण्याचा विचारही करणे टाळत होतो.
कोणाच ठाऊक, पण माझे काही मित्र जे व्यसनाचा शौक करायचे, त्यांपासून मी थोडा दूर राहायचो.
खरं तर मला कधी सिगारेट, दारू घ्यायची इच्छा झाली नाही, किंवा मी ती होऊ दिली नाही. या व्यसनांनी होणारे तोटे मला या गोष्टींपासून लांब ठेवायचे.
बरंच ऐकलं आहे मी या व्यसनांबद्दल.
सिगारेटच्या धुरामुळे श्वसन विकार, कॅन्सर; alcohol घेतल्याने होतो liver cirrhosis सारखा भयंकर आजार, cocaine घेतल्याने येतो हार्ट अटॅक व अन्य हृदय विकार, मारिजुआना सारखे ड्रग ब्रोंकाइटिस, एम्फिसिमा सारखे श्वसन विकार, वगैरे, वगैरे..
असे बरेच जीवघेणे परिणाम होऊ शकतात आपला आरोग्यावर या वस्तूंच्या व्यसनाने.म्हणून मी या वस्तूंचे सेवन करत नाही.
पण हो, एक व्यसन आहे मलाही,
ते म्हणजे व्यसन मोबाईल,आणि कॉम्पुटरचे!
याला आपण screen addiction सुद्धा म्हणतो.
माझी आई नेहमी मला रागावते, "अरे! ती टी. व्ही. जरा दुरून बघ", "मोबाईल जास्त वेळ नको खेळू", "कॉम्पुटर समोर जास्त नको राहू", "डोळे खराब होतील, चष्मा लागेल.."
आणि मागच्या महिन्यातच मला चष्मा लागला!
चष्मा थोडा हलका होता, कमी पॉइंटचा होता ना!
पण जर मी माझ्या डोळ्यांची काळजी घेतली नाही तर मोठा चष्मा लागू शकतो असे डॉक्टर म्हणाले.
या वेळी आई काही वेगळं बोलली नाही, कारण ती नेहमी मला त्या गोष्टीवर सांगून सांगून थकून गेली होती. आता वेळ होती मला समझायची.

आज काल तर या व्यसनाची फॅशन झाली आहे.
सोशल मीडिया वर व्यस्त असलेला माणूस जीवनातले छोटे छोटे आनंद गमावतो आहे, मोबाईल गेम्स च्या मागे मुलांच बालपण हरवून गेलं आहे. डोकेदुखी, मानसिक विकार, डोळ्यांचे विकार लहान लहान मुलांमध्ये दिसून येत आहे.
आणि आता मी ठरविले आहे, ह्या व्यसनांपासून मुक्त व्हायचं. हो, आता मोबाईल, कॉम्पुटरचं व्यसन जाणार तर नाही, पण या 'स्क्रीनच्या व्यसनाला' कमी करण्याचा प्रयत्न तर मी नक्की करणार,
आणि तुम्ही .?

©हर्षल कामडी✍️

Read More