Quotes by गिरीश in Bitesapp read free

गिरीश

गिरीश Matrubharti Verified

@girish1
(287.1k)

संगित -जुने नवे
https://youtube.com/shorts/tGptKi6JANs?si=vkDvRmQPtKDaQxK4

आषाढ
आषाढस्य प्रथम दिवसे,
नेमेचि येणाऱ्या पावसाचे,
केले कितीही गुणगान ते,
तरी कमी पडते..

हिरवीगार धरा,
सळसळणारा वारा,
उधळीती पाने फुले
सैरावैरा..

सृष्टी धरी सुर
वाऱ्याचा सुं सूं स्वर
पानांची सळसळ
ढगांची गडगड

ओलेत्या मातीचा
सुगंध तो मस्त
चिंब भिजल्या धरेचे रूप
भारून टाकी मनास

नैराश्याचे मळभ
जाई धुवून,
जीवनात तयार होई ,
पुनरपी
आशेचे सुर,
आशेचे सुर.

Read More

राष्ट्रसंत तुकडोजी महाराझ
https://youtube.com/shorts/dapUjlvWAew?si=D6EIynQriiIjmygR

ज्ञानेश्वर माऊली
https://youtube.com/shorts/nt2AvrHKSrg?si=lVNhTiyvhuenorVF

ग्राम गीता

epost thumb

शब्द
शब्द देतात प्रेमाचा संदेश, शब्द देतात प्रेमाचे संकेत, कधी विचार करायला भाग पाडतात तर कधी दुःखी करतात. शब्दातून कधी होतो आनंद व्यक्त. तिरस्कार आणि राग ही कधी होतो व्यक्त.

कधी शब्द करतात तुमचा दिवस सुखाचा. कधी शब्दांचा आघात असा की दिवस जळफळाटाचा.

शब्द बोचतात, काळजाला घरं पाडतात, निराशही करतात.

शब्दच देतात आधार, उत्साह, प्रेरणा.

चला या शब्दामार्फत आपण आनंद पसरवुया, प्रेम वाढवुया, जागवुया नवा उत्साह, स्फुर्तीचे शब्द बोलुया, शांतीचा संदेश देऊया, ह्रदये आनंदानी भरुया.

आशिर्वादाच्या शब्दानी लोकांना आनंद व समाधान देउया.

शब्द देतात रुग्णाना बरे होण्याची शक्ति, हार मानु लागलेल्याना देतात जिंकण्याची शक्ति.

शब्दानी फिटे अंधाराचे जाळे.

आपण फक्त स्फुर्तीदायक शब्द बोलूया.

बोलू आधार देणारे शब्द, उमेद देणारे शब्द.

कौतुकाचे शब्द, स्तुतीपर शब्द बोलूया.

शब्दाद्वारे प्रकाश पसरवुया.



शब्दांनी आशा, प्रेम, शांती चे संदेश देऊया.

शब्दांनी देऊ स्वास्थ्य, धैर्य व वैभवप्राप्तीचे संदेश.

गिरीश

Read More