Quotes by Maroti Donge in Bitesapp read free

Maroti Donge

Maroti Donge

@dongemaroti5gmail.com2638
(9)

आयुष्याच्या वळणावर आणखी एका पर्वाचा उदय झाला. सोनेरी पर्वाचा आस्वाद घेताना, जुन्या आठवणी हृदयात घर करतात. त्याला सहजासहजी विसरू शकत नाही. पण नवीन काही तरी घेण्यासाठी जुन्याचा त्याग करावाच लागतो. तेव्हाच आपल्याला नवीन घेण्याची, करण्याची उमेद आपल्या अंगात येत असते. तेव्हा त्यागाची भूमिका आणि नवीन स्विकारण्याच बळ अंगात येवो. तेव्हाच आपल्या जीवनाची प्रगती होईल. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.....!

आपलाच स्नेही
MBD

-Maroti Donge

Read More

जीवनात आपल्या सोबतीला कुणीही नसताना आपण स्वतःला एकटे समजतो. पण आपण एकटे नसतोच, कारण आपले हृदय आणि मन आपल्या सोबतीला असते. तेव्हाच आपण स्वतःचीच बोलण्याचा प्रयत्न करतो. त्याला आपण स्वगत म्हणतो. म्हणून आपण केव्हाच एकटेपणाचा आव आणू नका. आपण एका शरीराचा भाग आहोत. त्यात सर्व अवयव येत असते. ते आपल्या सोबतीला असते. MBD

Read More

प्रेमाचा रंग हा जीवनात कुणीतरी आली तरच जाणवतो, अशी धारणा आहे. पण प्रेम हे ठराविक व्यक्तींबद्दलच्या भावना दर्शविण्यापलिकडेही प्रेमाची भावना आहे. ती आपल्याला आपुलकी, जिव्हाळा, दया, करुणा, सस्नेह, मैत्री रूपातही दिसत असते. ते आपल्याला हृदयातून दिसून पडते.

MBD

Read More

माणसाची किंमत मोजताना आपल्या किती कामी पडतो, हे महत्त्वाचे नसते. पण आपल्यासाठी किती वेळ देतो ते महत्त्वाचे आहे आणि ती वेळ आपल्या आयुष्याच्या अशा टप्प्यातील असेल, ते आपल्या आयुष्याला कलाटणी देणारी असली पाहिजे.

-MBD

Read More

प्रत्येकाला स्वतःचे आयुष्य स्वमर्जीने जगण्याचा अधिकार आहे. पण दुसऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात येताना स्वतः च्या आयुष्यात बदल करूनच येण्याचा प्रयत्न करावा. कारण आयुष्य हे कुणा एकाच नसते. ते दोन व्यक्तीच्या हृदयाचं असते. त्यात तळजोळ करावीच लागते. म्हणून मन मिळालं, हृदय मिळालं, प्रेम मिळालं तरी आपण व्यक्ती अपूर्ण असतो. ते कोणत्याही रुपात.

-MBD

Read More

दुःखाच्या या लाटेत, तू स्वतः ला सावरुन उठ. तुझ्या जीवासाठी, तूच सार्थी बनून ये.
अशा या संकट प्रसंगी, तूच हिमतीने जागा हो. संकटाला घाबरून, स्वतःची हानी करू नको. आपल्या पाठीमागे असलेल्यांना तूच तारणहार आहे.
म्हणून घाबरून नको. पेटून उठून उभा राय. यास संकटाचा सामना कर, आणि उभा राह.

MBD

Read More

दुःखाच्या या लाटेत, तू स्वतःला सावरुन उठ.
तुझ्या जीवासाठी, तूच सार्थी बनून ये.
अशा या संकट प्रसंगी, तूच हिमतीने जागा हो.
संकटाला घाबरून, स्वतःची हानी करू नको.
आपल्या पाठीमागे असलेल्यांना तूच तारणहार आहे.
म्हणून घाबरून नको. पेटून उठून उभा राय.
यास संकटाचा सामना कर, आणि उभा राह.

MBD

Read More

आपल्या आयुष्याची वाट ही कठीण असली तरी चालेल. त्या कठीण परिस्थितीत जो स्वतः ला सिद्ध करतो. आणि आपल्या जगण्याला वेगळे पैलू देऊन आव्हानाला तोंड देतो तोच खरा श्रीमंत समजायचं.

MBD

Read More

तुमच्या जगण्याला अर्थ आहे ?

माणूस कितीही संकटात असला तरी हार पत्करू नका. कारण आपलं जीवनच अस आहे. ते आपल्या हार पेक्षा आपल्या सहनशीलतेवर अवलंबून आहे. म्हणून तुम्ही मनाने मजबूत व्हा.आणि जगण्याचा आस्वाद घ्या.

MBD

Read More

पैशाची श्रीमंती ही मनाच्या श्रीमंती पेक्षा लहान आहेच.
म्हणूनच पैशाचा गर्व करू नका. मनाची श्रीमंती आपल्या कर्तृत्वाचा अनमोल ठेवा आहे. तो सर्वाकडे असतोच असे नाही.

MBD

Read More