Quotes by sabdhpriyaa in Bitesapp read free

sabdhpriyaa

sabdhpriyaa

@authorpriyaa316
(1.2k)

कधी एकमेकांसाठी....
होकाराच्या प्रेमाला' नकार 'दिलाय?
मनात नसूनही त्याच्या आनंदासाठी मागे हटलाय ....
... तर मग तुम्ही खरा प्रेमाचा रंग पाहिलाय.....!
@शब्दप्रिया_ती लिहिते✍️

Read More

त्याने प्रेमाला ईतकं मुश्किल का बनवलं
दोन्हीकडून होकार होता
आणाभाका ही होत्या
मग नेमकी माशी शिंकली कोठे?
जुन्या वैराची बदल्याची भावना
प्रेमाला वरचढ ठरली.
कुणाचा राग कुणावर निघाला...
सूड ज्याचा त्याचा पूर्ण झाला
पण तिने यात आख्ख भविष्य हरले.
@शब्दप्रिया_ती लिहिते✍️

Read More

जगातलं सर्वात मोठं दुःख एका बाजूला पडते....
जगातलं सर्वात मोठं दुःख एका बाजूला पडते....
स्वतःला तुटताना पाहणे ही कमी च वाटते...
आई वडील असताना अनाथ असल्याची जाणीव जेव्हा वेळ वेळोवेळी दाखवते ...
ती वेदना ....
जिवंतपणी रोज मला जाळून टाकते...!
@शब्दप्रिया_ती लिहिते✍️

Read More

सोप्प असत ... मला फरक पडत नाही बोलायचं
सोप्प असत ... मला फरक पडत नाही बोलायचं,
अवघड असत ती समोर आल्यावर काळजाला सांभाळायचं ......
सोप्प असत तिच्या शिवाय राहायचं
सोप्प असत तिच्या शिवाय राहायचं,
खरी परीक्षा असते तिच्याविना एक सेकंद जगायचं .......
@शब्दप्रिया_ती लिहिते✍️

Read More

अदृश्य..... तो 🥺


जेव्हा स्वतः बाहेर पडलेय चार पैसे कमवायला
जेव्हा स्वतः बाहेर पडलेय चार पैसे कमवायला
दुनिया नोकरी म्हणते ज्याला

आता कळतेय मला त्याची निःशब्द धडपड
आता कळतेय मला त्याची निःशब्द धडपड
सुट्टी असूनही कामावर जाण्याची घाई
अन् रात्री उशिरा येण्याची वेळ
त्याला सुट्टी नावाचा पर्याय च नसतो
आपण ज्याला त्याचा कुटुंबा प्रती निष्काळजीपणा म्हणतो
खरं तर
जग त्याला कर्त्या पुरुषाची जबाबदारी म्हणतं.....
@शब्दप्रिया_ती लिहिते ✍️

Read More

आता पुढे जायचं ठरवलं आहे
स्वतःला एक नवी संधी द्यायची ठरवली च आहे
मागे वळून पहायचं नाही हेही मनाला ठामपणे बजावलं होतं
मग ही हुरहूर का????
नवीन दिवसाची सुरुवात
मग........
कालच्या आठवणीने का???
पाणावल्या डोळ्यांनी मग हृदयाने उत्तर दिलं
पाहिलं असो वा दुसरं......!
खरं प्रेम विसरण कुणाला शक्य झालं 🥺
@शब्दप्रिया_ती लिहिते✍️

Read More