Quotes by Arti in Bitesapp read free

Arti

Arti

@arti1605


कला

एक मुलगा असतो, तो अकरावीत शिकत असतो, तो अभ्यासात खूप हुशार आणि बाकीच्या ऍक्टिव्हिटी मध्येही खूप ऐक्टिव असतो आणि या सर्व गोष्टींमध्ये त्याच्या अंगातली एक सुंदर कला म्हणजे नृत्य. तो इतकं सुंदर नृत्य करायचा की बघणार्‍यांची पापणी देखील पडत नव्हती, त्याच्या नृत्यामध्ये एक वेगळीच अदा एक वेगळीच सुंदरता होती. असाच एके वेळी तो त्याच्या मित्रांमध्ये बसला होता,
त्याचा एक मित्र त्याला म्हणाला की....

* अरे तु काय मुलींसारखा नाचत असतोस.

* सगळेजण हसायला लागतात.

* तो मुलगा म्हणतो,
अरे यात वाईट काय आहे, माझ्यामध्ये जी कला आहे, ती मी लोकांसमोर आणतो, रादर माझ माझ्या कलेवर, माझ्या नृत्यावर खूप प्रेम आहे.

* ते काही मला माहीत नाही, तुला जर का आमच्यासोबत रहायच असेल तर तुला तुझा हा नाच सोडावा लागेल.

* हे बघ तु माझ्याबद्दल काहीही बोल पण माझ्या कलेबद्दल काहीही बोलायच नाही, माझ्या कलेचा अपमान केलास तर मी ते सहन करणार नाही, त्यामुळे नीट बोल.

एवढे बोलून तो मुलगा त्याच्या घरी जातो व त्याच्या आईला झालेली सर्व घटना सांगतो. त्यावर त्याची आई त्याला म्हणते....

* अरे बाळा झालेल्या गोष्टीच तु वाईट वाटून घेऊ नकोस, या जगामध्ये सगळीच लोक चांगलीच असतात असं नाही. काही लोक चांगलीही असतात तर काही लोक वाईटही असतात वाईट लोकांकडे आपण लक्ष नाही द्यायच, आपण फक्त चांगल्या लोकांकडे लक्ष द्यायच.
हे बघ बाळा देव सगळ्यांच्या अंगात कला देतो, ती कला जपण अणि जोपासनं फक्त आपल्या आणि आपल्याच हातात असतं. तु तुझी कला जप, कधीच तुझी कला वाया जाऊ देऊ नकोस. तु तुझ्या कलेला जप, तुझ्या कलेला तु जोपास.
आणि राहिला प्रश्न तुझ्या मित्रांचा तर कदाचित तु मोठा झाल्यानंतर तुझे हेच मित्र तुझ्याकडे परत येतील.

* हो आई तु म्हणतेस ते अगदी बरोबर आहे.
मी माझी कला कधीच सोडणार नाही. मी माझी कला जोपासेन आणि खूप मोठा होईल.
थॅंक यू आई .

Read More