Quotes by Archana Rahul Mate Patil in Bitesapp read free

Archana Rahul Mate Patil

Archana Rahul Mate Patil

@archanapatil4545
(129.9k)

कधी कधी आपलं पाहणं हा स्वार्थीपणा वाटत जरी असला तरी आजकालच्या युगात स्वार्थी लोकांमुळेच आपल्याला सुद्धा आपला स्वार्थ साधून घ्यावा लागतो.. तो ही अगदी निस्वार्थपणे..!!
- Archana Rahul Mate Patil

Read More

आपण आपलं आपल्यापुरतं पाहायचं, आपलं कोणीच नसतं,आपल्या आसपास अवतीभवती असलेल्या अनेक जणांना आपल्या आयुष्याशी काही घेण देणं नसत..!!!
- Archana Rahul Mate Patil

Read More

एखाद्याची चुकी नसताना त्याला Blame करणं खूप सोपं असतं.. कारण आरोपापेक्षाही प्रत्यारोप नेहमीच लक्षात राहतो..
- Archana Rahul Mate Patil

Read More

कुणी ठेवलेल् स्टेटस हे आपल्यासाठीच ठेवलय असं वाटेपर्यंत, एवढं वाईट वागायचंच कशाला??
- Archana Rahul Mate Patil

दुसऱ्यांना फुकटचे सल्ले सगळ्यांना देता येतात,सोप असतं..!!
तोच सल्ला स्वतःला लागू करायला,जड जातं..!!
- Archana Rahul Mate Patil

Read More

राग आपोआप येतो,पण
तोंड बंद ठेवन आपोआप होत नाही,ते करावं लागतं..
म्हणता ना.. डोळे चांगले असले ना की आपलं जगावर प्रेम होईल.. पण आपली जीभ गोड असेल तर जगाचं आपल्यावर प्रेम होईल ..
- Archana Rahul Mate Patil

Read More

बाप गरीब असो वा श्रीमंत
मुलीचे हट्ट पूर्ण करायला कधीच कुठ कमी पडत नाही!!
बाप बाप असतो,
त्याच्या प्रेमाचं कुठलंही मोज माप नसते.
काळजी अमाप असते..
आभाळाएवढी माया असते..!!
Archu..!!
- Archana Rahul Mate Patil

Read More

पुस्तक ही हिऱ्या माणिका पेक्षाही मौल्यवान असतात, कारण इतर रत्नापेक्षाही शब्दरत्न माणसांचं जीवनभर आयुष्य उजळवतात!!
- Archana Rahul Mate Patil

Read More

माझ्या मराठी बोलू कौतुके
मातृभाषा मराठी माय मराठी!!!

*पोवाड्यातल्या शौर्याची,
आरतीतल्या टाळ्यांची.
अभंगातल्या विठू नामाची
भाषा माझी मराठी..


भजनातल्या भक्तीची.
गाऱ्हाण्यातील साकड्याची
गोंधळ्याच्या उदोउदोची
भाषा माझी मराठी...

जात्यावरच्या ओवी ची.
कीर्तनातल्या कथेची
भारुडआतल्या प्रबोधनाची
भाषा माझी मराठी


कथा कादंबऱ्याची
नाटक आणि कवितांची
बालगीत गोष्टींची
भाषा माझी मराठी

साधुसंतांचा उपदेश,
भगव्याचा स्वाभिमान
शिवरायांच्या उपकारांची
जाणीव आहे मराठी...

देणगी या शब्दांची
आठवण मातीची
अफाट या साहित्याची
भाषा माझी मराठी!!

संत परंपरेची
भक्त भगवंताची
सखू मीराबाई ची
भाषा ही मराठी..

ज्ञानदेव नामदेव
सोपान एकनाथ
जनार्धन चांगदेव
भाषा माझी मराठी

तुकोबा अन चोखोबा
संत सावता माळ्याची
माझ्या विठुरायाची
भाषा आहे मराठी


मराठी भाषा गौरव दिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा...!!!
Archu..!!!*

Read More

लक्षात लक्ष घालून आपल्या लक्षात ठेवा आपल्या आजूबाजूला काय चाललं त्यापेक्षा आपलं काय चाललं हे लक्षात घ्या, हीच गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी असल्यामुळे संपूर्ण लक्ष घालून लक्षात ठेवा आलं ना लक्षात
- Archana Rahul Mate Patil

Read More