Quotes by Akshay Varak in Bitesapp read free

Akshay Varak

Akshay Varak

@akshayvarak135316

तुज्या येण्याची चाहूल बघ लागली मनाला

माज्या हृदयाला गं माज्या हृदयाला

आठवणींचा डोंब माज्या भरला मनात

रात दिन हिंडतो मी प्रेमाच्या शहरात

कल्पनानगरीत मी पाहतो गं तुला

माज्या प्रेमाच्या फुलाला माज्या प्रेमाच्या फुलाला

काय बोलू काय नाही मज आता समजेना

प्रेम माजे तुला न कळेना.... तुला न कळेना

हळुवार सुरताल माज्या लागे कवितेला

एक एक शब्द फक्त तुज्यासाठीच लिहिलेला

प्रेमरंग सारे माज्या अतरंगी भिनले गं...

पाहुनी तुला माझे हृदय भिजले गं...

होत नाही सहन मज आता हा दुरावा

तुजविण जीव माजा का उरावा

क्षण बघ सारे कसे गेले उलटून

मन माझे रडे तुज आठवून

लागलाय छंद तुजा , मज घेणा समजून

प्रेमसागरात कसा गेलो मी वाहून

मज मिळेना किनारा मज मिळेना सहारा

त्या प्रेमसागरात उठला प्रेमरंगाचा गं वारा

नभ दाटून गं आले माझे नेत्र भरताना

पाहुनी तुज उधाण भरे माज्या भावनांना

सोबतींचे क्षण सारे जाऊ कसा विसरुनी

एक एक क्षण सारा मी ठेवलाय जपुनी

थांब थांब सांगतो तुला एक कहाणी

हा दुरावा करतोय मज खूपच हानी

-अक्षय वरक

Read More