Rang Majha Vegla - 2 in Marathi Women Focused by manasvi Manu books and stories PDF | रंग माझा वेगळा - 2

Featured Books
Categories
Share

रंग माझा वेगळा - 2

भाग दोन 

सरिता आत निघून गेली ती तिच्या खोलीत खिडकी जवळ उभी होती . तेवढ्यात तिच्या कानावर आवाज आला ... 

" अभय !! अरे तू सांगितले का नाही काकू ला . तुला मलगी आवडली आहे ते . " 

" सागर !! अरे तुला तर माहीतच आहे ना की माझं आई पुढे अजिबात चालत नाही ती जे ठरवते तेच होतं आमच्या घरात , खरंतर आई ला मुलगी पसंत नाही . ती सावळी आहे ना म्हणून . पण ती इतक्या मोठ्या पदावर काम करते , भरपूर पगार आहे तिला , आणि शिवाय ती हुंडा सुध्दा मागणार आहे . आणि तिचं म्हणणं असं आहे की मुलगी सावळी आहे तर तिचे आईवडील आपण मागू तेवढा हुंडा देतील ... वरून तिचा दर महिन्याचा लठ्ठ पगार असेलच की . म्हणून आई ने ह्या मुलीला निवडलं आहे की रंग सावळा आहे त्या मुळे आपण तिला आपल्या घरी आणून तिच्या आणि तिच्या घरचयांवर उपकार करू जेणेकरून आयुष्भर ते आपल्या समोर डोकं वर करू शकणार नाही . " अभय ने सांगितले. 

" अभ्या ह्या क्षणी मला स्वतःचा राग आणि तुझी लाज वाटतेय ...तू माझा मित्र आहेस म्हणून लाज आणि मी तुझ्या सोबत इथे आलो या साठी स्वतः चा राग . " 

या पुढे ऐकून घेण्याची सारिता ची मनस्थिती नव्हती . ती तशीच रागाने फणकारत बाहेर च्या खोलीत गेली . तिथे गेल्यावर तिच्या कानावर जे पडलं त्या मूळे ती अजून संतापली ... 

" दहा तोळे सोनं . मुलाला सोन्याच्यी चेन माझ्या साठी आणि माझ्या मुली साठी एक एक सोन्याची कानातले , मुलाच्या वडिलांना सोन्याची अंगठी , एक कार , भांडीकुंडी  तर तुम्ही द्यालंच त्या शिवाय आमच्या सगळ्या नातेवाईकांना भारीतल्या साड्या आणि सुटाच कापड दोन दिवसा च व्यवस्थित लग्न , बास...." मुलाची आई हुंड्याची यादी वाचून दाखवत होती . 

" अहो वहिनी , हे जरा जास्तच आहे .. " सरीता ची आई बोलली . 

" अहो ...मग तुमच्या मुलीचा रंग सुद्धा जरा जास्तच गडद आहे की . आता तिला आम्ही खपवून घेतोच आहोत ना . वरून आमची पुढची पिढी सुध्दा पणाला लावतोय. पुढे मुलांनी जर आई चा रंग घेतला तर ...??? " मुलाची आई तोऱ्यात बोलली. 

" बासssss बास झाली तुमची नाटकं, लग्नाच्या बाजारात विकायला काढलेल्या आपल्या मुलाला उचला आणि चालत्या व्हा इथून . " सरिता बाहेर येऊन कडाडून बोलली . 

तिथे बसलेले सगळे लोकं स्तब्ध झाले . आतला आवाज ऐकून अभय आणि सागर आत आले . 

" बाई ...बाई ... काय तोरा आहे मुलीचा . हे बघा ही अशी तोंडाळ मुलगी आम्हाला सून म्हणून नको . हे लग्न शक्य नाही . " मुला ची आई बोलली . 

" तुम्ही काय नकार देणार मला , मला च तुमच्या ह्या आई च्या पदरात लपणगऱ्या , स्वतः च मत नसणाऱ्या , बावळट मुलाशी लग्न करण्यात काडी चा इंटरेस्ट नाही . मी स्वतःला आणि माझ्या आई वडिलांना सांभाळायला सक्षम आहे . मला लग्ना च्या कुबड्या नकोत ... तुम्ही चालते व्हा इथून . आईsss हे लोक गेल्यावर दार नीट लावून घे . " 

इतकं बोलून सरिता तडक आत निघून गेली . त्या मुलाची आई बडबड करत बाहेर निघून गेली . घरातलं वातावरण एकदम शांत होऊन गेलं . सरिता ने आपल्या खोलीचं दार बंद करून घेतलं आणि आपल्या अश्रुंना वाट मोकळी करून दिली . 

काही दिवस असेच निघून गेले . घरातील वातावरण आता जरा सैल झालं होतं . त्या दिवशी रविवार असल्याने सगळे घरातच होते . सरिता बाहेर च्या खोलीत बसून तिचं काहीतरी काम करत होती . तिच्या दोन्ही काकू आणि आई स्वयंपाकघरात होत्या घरातली पुरुष मंडळी इतर कामात होते . दोन्ही वहिनी घरातील आवराआवर आणि त्यांच्या मुलांच सगळं बघण्यात व्यस्त होत्या . तेवढ्यात घरासमोर एक गाडी येऊन उभी राहते . त्यातून जवळपास सरिता च्या आई च्या वयाची एक बाई बाहेर येते आणि सरिता च्या दारावरची बेल वाजवते . 

" कोण पाहिजे आपल्याला . " सरिता तिच्या गोड आवाजात त्यांना विचारते . त्या बाई सरिता च्या मोठ्या बोलक्या डोळ्यांकडे बघत असतात . सरिता पुन्हा त्यांना विचारते . 

" अहो !! कोण पाहिजे आपल्याला . " तेवढ्यात त्या बाई भानावर येतात आणि प्रेमाने सरिता ला विचारतात ... 

" पटवर्धनांचं घर हेच का बाळा . " 

" हो ...हो ...हेच... कोणाला भेटायचं आहे आपल्याला. " सरिता ने विचारले . 

" कोणाला ही बोलावं जे माझ्या पदरात हे दान टाकू शकेल ..." त्या बाईनीं प्रेमाने सरिता च्या डोक्यावर हात फिरवत सांगितलं. 

सरिता काही बोलणार तेवढ्यात सरिता चे बाबा बाहेर आले आणि त्यांनी सरिता ला विचारलं... 

" अगं सरू !! कोणाशी बोलतेय , कोण आहे बाहेर... ?? " 

" बाबा !! ह्या ...ते ... मला माहित नाही. " सरिता ने अडखळत उत्तर दिलं . तेवढ्यात मागून एक रुबाबदार,  उंच , गोरापान , देखणा मुलगा येऊन त्या बाईंच्या जवळ येऊन उभा राहिला. 

" नमस्कार !! हा माझा मुलगा सागर , आम्ही  आत येऊ का ..?? " त्या बाई गोड आवाजात बोलल्या . 

" अं....हो , हो...या ना ..." सरिता चे बाबा बोलले आणि त्यांना घेऊन आत आले . तेवढ्यात सरिता चे मोठे काका पण बाहेर आले . सागर ला बघून बोलले . 

" तुम्ही त्या दिवशी ...ते ..." सागर ने त्यांना मधेच अडवले आणि बोलला ... 

" हो मी तोच त्या दिवशी अभय सोबत मी आलो होतो . तेव्हा माझा अर्धा च परिचय झाला . तो मी आज पूर्ण करून देतो .‌मी मेजर सागर बापट आणि ही माझी आई सुनंदा बापट . माझे वडील कर्नल श्री सुरेश बापट देशासाठी शहीद झाले . " 

" पुढचं मी सांगते . मला माझ्या सागर साठी तुमची मुलगी सरिता खूप आवडली आहे . मला तुमची मुलगी द्याल का ......?? " 

सरिता हे ऐकून एकदम चकित झाली . तिने स्वतः ला सावरलं आणि बोलली ... 

" एक मिनिट . त्या दिवशी तुमच्या मित्राला मी जे सांगितले ते मी तुम्हाला पण सांगू इच्छिते. मला कोणाच्याही दये ची गरज नाही . माझ्यावर उपकार करायची गरज नाही . " नकळत सरिता च्या डोळ्यात पाणी आलं. ती उठून आत जाण्यासाठी वळली , तेवढ्यात सागर ने तिला अडवले. 

क्रमशः 

>⁠.⁠<>⁠.⁠<>⁠.⁠<>⁠.⁠<>⁠.⁠<>⁠.⁠<>⁠.⁠<>⁠.⁠<>⁠.⁠<>⁠.⁠<>⁠.⁠<>⁠.⁠<>⁠.⁠<>⁠.⁠<