Mission Khodad - First Man on the earth - 1 in Marathi Human Science by Vilas Khodade books and stories PDF | मिशन खोडद : पृथ्वीवरील पहिला देवमाणूस - भाग 1

Featured Books
  • मेरी साहित्यिक यात्रा

    संस्मरण मेरी साहित्यिक यात्रा - सुधीर श्रीवास्तव से यमराज मि...

  • अंश, कार्तिक, आर्यन - 10

    मल्होत्रा का महलमल्होत्रा का महल…घर कम, ऐलान ज़्यादा था।ऊँचे...

  • VORTX - 3

    — "ब्रह्मांड की दरार: 5वीं सदी का वो खौफनाक सफर"दृश्य 1: भवि...

  • Agent Tara - 5

    फाइनल टेस्ट पास करने के बाद तारा की भूमिका सहयोग फाउंडेशन मे...

  • लिव-इन

    लिव-इन                           कमल चोपड़ा                ...

Categories
Share

मिशन खोडद : पृथ्वीवरील पहिला देवमाणूस - भाग 1

खूप खूप वर्षांपूर्वीची, अगदी करोडो वर्षांपूर्वी आपल्या सूर्याची व आपल्या पृथ्वीची उत्पत्ती झाली. पृथ्वी तयार झाली खरी पण आज आपण चंद्र आणि मंगळ ग्रह पाहतो ना अशीच काही आपल्या पृथ्वीची सुद्धा अवस्था होती, बंजर जमीन, खड्डे, मध्येच घोंगवणारे आवाज, पण जमिनीच्या आत मोठ्या प्रमाणात हालचाली होऊन अनेक वायू बाहेर पडले. अनेक वायूंनी आकाशमंडळ धूर, धुके, व वायूनी भरून गेले. व अनेक वर्ष सतत रात्रंदिवस सारखा पाऊस पडू लागला व यातूनच जमिनीवरील पाणी उताराने वाहत जाऊन समुद्र व महासागर तयार झाले.व हळूहळू पाण्यात वनस्पती तयार झाल्या आणि अशाच वनस्पती पाण्याबाहेर व जमिनीवर तयार झाल्या. व पाण्यात लहान जीव तयार होऊन लहान मोठे प्राणी सुद्धा तयार झाले.  वनस्पती तयार झाल्या, लहान मोठे सजीव तयार झाले पण आपले मानवाचे कुठे साधे निशाण देखील लाखो वर्ष नव्हते.
        निसर्गाने आपले रूप दाखवायला सुरुवात केली होती. पाऊस पडू लागला होता, सूर्यदेव दररोज उगवून वरती येत होते. वनस्पती व प्राणीही तयार झाले होते. पण पृथ्वी मात्र आपले अधून मधून विक्राळ रूप दाखवीत असे, अनेक ज्वालामुखी या अगोदर आपले  भयानक रूप दाखवून शांत झाले होते. तर  काही अजूनही तेवत होते तर काही अधून मधून फुटत होते. भूकंप सुद्धा अधूनमधून जमिनीला हदरा देत होते. आणि काही अस्ट्रॉनाईड जमिनीवर पडून खड्डे करून त्यात वाहते पाणी साचून ठेवत होते. ज्या भागात असे खोल खड्डे ज्वालामुखी किंवा अस्ट्रॉ्णोईड पडून झाले होते या भागात तलाव तयार झाले होते. झील तयार झाल्या होत्या.
          पृथ्वीवर ज्या काही झील तयार झाल्या होत्या, जे काही तलाव तयार झाले होते त्यातच एक अशी झील होती कि ज्या झीलने,  तलावाने मानवी उत्तपत्तीची यशोगाथा लिहिली.
      मुसळधार पडणारा पाऊस, सूर्याचा तेजस्वी प्रकाश, संपूर्ण खडकरुपी पृथ्वी, वर असणारे काळे निळेशार आकाश, सगळीकडे पसरणारा वायू म्हणजेच अग्नी जमीन, पाणी, हवा,आकाश या पंचमहाभूतापासून सजीवाची उत्तपत्ती झाली.
    लाखो वर्षानंतर पृथ्वीवर मानवाचे पाऊल पडले होते. ऊन, वारा, पाऊस, या सगळ्या गोष्टीवर मात करत पृथ्वीच्या एक आशा महान भागामध्ये मानवी उत्त्पत्तीसाठी, पोषक वातावरण व जागा तयार झाली, कि या भागात पहिल्या मानवी सजीवांनी पृथ्वीवर जन्म घेतला होय. हेच ते देवस्थान कि जेथे साक्षात मानवरूपी देवाने जन्म घेतला. याच भागात दैवीशक्तीने आपला प्रभाव दाखवला तुरकांना झील, होय तुरकांना झील, तुरकांना सेंट्रल आईसलँड केनिया.
  केनिया देशात असणारी ही झील मानवी उत्त्पत्तीची गाथा सांगते. उंचच उंच डोंगराचा भाग मध्येच पसरट होतं जाणारा प्रदेश, तर काही भागात जमिनीला खोलगट पडलेले खड्डे, आणि त्यात साचणारे पावसाचे पाणी, आणि याच भुभागात वाढणाऱ्या वनस्पती चोहोबाजूने पाणी व मध्येच उंच डोंगराचा भाग अगदी बेटासारखे ठिकाण तलावाच्या मध्यभागी असणाऱ्या या भागात या जमिनीत खोल खड्डा साहजिकच आकाशातील खडक किंवा ज्वालामुखीची ही हमकास किमया आहे. खूप दिवस तलावाच्या भागात खूप पाणी असायचे व सोबत जो जमिनीचा भाग होता या भागात सुद्धा खड्डा व त्यात स्वच्छ, निर्मळ, गोड पाणी असायचे. पाण्यात जीव जन्मास येऊन हळूहळू या जीवाचे रूपांतर होऊ लागले. हा जीव ज्या भागात जाईल त्या भागात त्याचे रूपांतर होऊ लागले. व त्याच बरोबर अनेक इतर प्रजाती जन्म घेऊ लागल्या व उजेडला तो एक दिवस कि याच तलावाच्या भागात मानवी उत्त्पत्तीसाठी, त्याच्या वाढीसाठी व संरक्षण होण्यासाठी असे पोषक अनुकूल असे वातावरण तयार झाले. कि या पृथ्वीवर पहिला माणूस जन्मास आला. व हळूहळू याच झीलमधील डोंगर भागावर मानवी प्रजाती वाढीस लावणारी पहिली जोडी तयार झाली.
   काळोख्या अंधाराला भेदत, सूर्यप्रकाश, पाणी, अग्नी, खडक व वायू यांचा एकत्रित मिलाप होऊन मानवी आकृतीने जन्म घेतला. तप्त सूर्याचा प्रकाश, दाट झाडी, लहानसा भुभाग, चोहोबाजूने पाणी, गारठून टाकणारी थंडी, कधी मध्येच पडणारा धो- धो पाऊस काहीच समजत नव्हते. आणि यात आणखी भर पडायची ती आग ओकत खाली येत जमिनीवर पडणाऱ्या विजांच्या लोळाची मग अगदी अंगाचा थरकाप उडून जातं असे. आणि तिचा आवाज, काय सांगावे आवाजाने तर आणखी गाळण उडून जातं असे.
   सूर्यदेव रोजच्या सारखे उगवून वरती आले होते. तळ्यातील पाणी डोंगराच्या कडेला येऊन आदळत होते. लाटामागून लाटा नवीन तयार होतं होत्या. त्याही पुन्हा डोंगराला येऊन मोठा आवाज करत आदळत होत्या. लहान होतो ना आम्ही खूप आवाजाने खूप भीती वाटायची मग कशाला जाऊ आम्ही पाण्याकडे हॊ पण जेव्हा तहान लागायची मग मात्र जावेच लागायचे पाण्याकडे हॊ पण भीती वाटायची हॊ या खूप मोठया पाण्याची, पण काय करणार एकदा कि घशाला कोरड पडली कि जावेच लागायचे पाण्यात न जाऊन सांगायचे कुणाला व पाणी न पिता राहायचे कसे. तरी खूप सहन करायचो आम्ही तहान जरी लागली तरी जात नसायचो तिकडे पण पावलो पावली जीवन सगळे कसे परीक्षा पाहत असायचे तहान असाहय्य झाली कि भीत भीत जायचो व कडेला थांबून पाणी पित असत आणि त्यातही आमच्या सारखेच पाण्यात दुसरे दिसले कि मग आमची आणखी घसरगुंडी उडत असे. व फजिती होतं असे. पण आम्हांला हे सगळे समजू लागले होते. अगदी नवीन नवीन बाळे मोठमोठी होतं होती त्यांनाही आता समजत असे. हळूहळू भीती थोडी कमी झाली होती पण आजूबाजूला असणारी तलावातील अफाट पाण्याची भीती धडकी भरवत होती. पण इथे मात्र वाघ, सिंह, मोठे प्राणी मात्र मुळीच नव्हते. इथे लहान लहान प्राणी राहत होते.
      आम्ही आता याच पाण्याच्या भागात वाढू लागलो होतो. हळूहळू संख्या वाढत होती. या भागात असणारी फळे, कंदमुळे, झाडाचा पाला खाऊन आम्ही झोपत होतो. पण हे अन्न आम्हांला खूप मोलाचे वाटत होते. आम्ही अगदी प्रारंभीक थोडेच होतो. खायला मिळून कमी लागत असे पण पावली केल्याशिवाय, फिरल्याशिवाय मात्र काही खायला मिळत नव्हते. मग या डोंगरावर फिरायचे खायचे, पाणी पियायचे व झाडाखाली झोपायचे. झाडावर चढायला सुद्धा आवडत असे पण झाडावर चढणे ही सुद्धा एक कसरत होती. पण आम्ही ती कसरत दररोज करायचो सवयच झाली होती तशी. आणि न करून कसे चालेले, लहान मुलांना आई खाऊ घालायची आईला लहान मुलांची काळजी होती व समूहातील माणसांना सुद्धा बाकी इतरांची काळजी होती. आपल्या सारखे आपण थोडेच आहोत एकमेकांना मदत करायला हवी प्रत्येकाला माहित होते. आणि याच भागात अनेक वर्ष सगळे एकत्र राहत होते.
    दुपारची वेळ होती सगळी कशी झाडाखाली सावलीत विश्रांती घेत बसली होती. एवढ्यात बाजूच्या झाडावरून ओरडण्याचा आवाज आला, आर्त किंकाळी, भीतीदायक ओरडणे ऐकून सगळे घाबरले, बिचारा पूर्ण झाडाला खाली लोंबला होता
तो झाडावरून खाली पडणार होता, झाडावर फळे काढण्यासाठी चढला होता, काही खाऊन झाली होती, पण उतरताना मात्र हात निसटला पण निसट ताना सुद्धा एक हात फांदीला घट्ट धरून राहिला होता. कित्येक वेळा काही जण खोडावर चढताना घसरून पडले होते. हातपायाला इजा ही झाली होती. पण जेव्हा पडल्यावर एक चांगले वयात आलेले बाळ त्याला लागले जखम झाली, रक्तही बाहेर आले आणि त्याचा घाव वाढत गेला जखम झाली व तो त्यातच दगावला त्याला सर्वांनी यातना सहन करताना पाहिले, किती त्रास होतं होता, मग झाडावर फळे शोधण्यापेक्षा लहान झाडांचा पाला, त्यांची फळे, खालची कंदमुळे बरी चांगलीच परीक्षा घेतली होती, तेव्हा उंच झाडावर चढणे प्रत्येक जण टाळत होता.पण हे बाळ नजर चुकून झाडावर चढले होते आणि लटकले होते.