Mukhvate - 1 in Marathi Thriller by Balkrishna Rane books and stories PDF | मुखवटे - 1

Featured Books
  • इस घर में प्यार मना है - 15

    उस दिन मनमोहन और प्रार्थना किसी काम से गाँव के दूसरे छोरगए ह...

  • पर्दे के पीछे - 3

    सब औरतों की हँसी-मज़ाक चल रही थी।किसी के नए सूट की बात…किसी...

  • The Marriage Mistake

    भाग 1दिल्ली की ठंडी रात, चमकती रोशनी, और शाही होटल "रॉयल क्र...

  • भक्त प्रह्लाद - 3

    प्रतिशोध की ज्वालाहिरण्याक्ष से राजपाट की बागडोर मिलने के पश...

  • मेरा प्यार - 5

    ​एपिसोड 4: बेनाम लगाव और ऊँची दीवारें​वक़्त पंख लगाकर उड़ रहा...

Categories
Share

मुखवटे - 1

मुखवटे (गूढ दिर्घ कथा-  बाळकृष्ण सखाराम राणे)मुखवटे भाग १मी होळीसाठी तळकोकणात, गोवा सीमेवरच्या त्या सुंदर खेडेगावात सायंकाळी पोहोचलो होतो. मी अगोदरच देवस्थानच्या अध्यक्षांशी संपर्क साधला होता.मला तिथल्या होळी व गडे उत्सवावर एक माहितीपट बनवायचा होता.त्यांनी माझी राहण्याची व्यवस्था एका परब नावाच्या मानकर्यांकडे केली होती. पहिल्या दिवशी होळी उभी करण्याचा क्षण मी चित्रीत केला.साठ फुटा पेक्षा उंच सरळ सोट व जाड अश्याआंब्याच्या झाडाची होळी ज्या कुशलतेने उभी केली ते बघण्यासारखे होत.होळीभोवती गवत ( कराड) पेटवून रोंबाट घातलं गेलं.तरूणांचा उत्साह जबरदस्त होता.नमण झालं.मानकर्यांने गार्हण घातलं. लोकांची आंगवणी व गार्हाणी झाली.कोकणातलं गार्हाण हा प्रकार आगळा वेगळा होय." बा, म्हराजा " पासून सुरुवात होते.मग  ' एकाचे एकवीस कर.पाचाचे पंचवीस कर.ह्या लेकरांचा जा मागणा आसा ता पुरा कर.तूझ्या नावाक जाग."अस लांबलचक गार्हाण असतं.मग समोरच्या भूमीकेच्या देवळात सांगणं झाले. रात्री दोन एक वाजता हे सगळं संपलं.दुसर्या दिवशी मी काही मुलाखती घेतल्या.सगळा गाव फिरलो.अतिशय सुंदर गाव होता.चहूबाजूंनी डोंगर... एक छोटीनदी...शेत...शेतातला भाजीपाला...मध्ये मध्ये घोंगावणारावारा मस्त वातावरण होतं.एकूण बारा राखणदारांच्या बारा घुमट्या वेगवेगळ्या दिशेने होत्या.मी दुपारी जेवणानंतर झोप काढली.  रात्री पुन्हा जागरण करायचं होत.संध्याकाळी घरमालकांची मुलाखत रेकॉर्ड केली.मला त्यांच्या कडून कळालं की आजपासुन तीन दिवस गड्यांचा खेळ सुरु होणार आहे. हा खेळ शेकडो वर्षांपासून सुरू आहे.खर तर हा खेळ शंकर पार्वतीचा आहे.बाकी सगळे निमित्तमात्र असतात.गडे म्हणजे शंकराचे गण..जी माणसे गडे असतात त्यांच्या अंगात गणांचा संचार होतो. पूर्वी लाईट नव्हती तेव्हा हा खेळ खूप रंगायचा.त्यांनी मला सूचना केली की रात्री जे काही घडेल त्याच शूटिंग करायला बंदी आहे.रात्र झाली की कोणालाही गावाबाहेर जाता येत नाही.मी उत्सुकतेने रात्रीची वाट बघत होतो.सायंकाळपासूनच गर्दी सुरु झाली.रस्ते माणसांनी भरून गेले.त्यात काही विदेशी लोकही होते.जागोजागी वाहणे पार्क केलेली दिसत होती.मी परब काकांनी दिलेल्या चवदार जेवणावर ताव मारला व बाहेर पडलो.महादेव मंदिर आणि नजीक असलेले भूमिका देवालय रंगीत दिव्यांच्या रोषणाईने सजले होते. ढोल ताश्याच्या गजरात  तरुण, वृध्द बेभानपणे नाचत होते. अनेकांनी रंगीत मुखवटे घातले होते.कोणी शंकसुराचा...कोणी हनुमानाचा....कोणी लालभडक जीभ बाहेर आलेल्या राक्षसाचा .. किंवा शिंगे असलेल्या राक्षसांचा मुखवटा कुठे उग्र रुप धारण केलेल्या नरसिंहाचा मुखवटा तर कोणी वाघ व अस्वलाचे मुखवटे घालून तोंडातून विचित्र आवाज करत नाचत होते. अखेर तो क्षण आला नमन झाल्यावर देवळातून गडे बाहेर आले.सुमारे बेचाळीस गडे होते.कमरेला शुभ्र धोतर त्यावर कमरेभोवती गुंडाळलेला काळा पट्टा..हातात एक दांडा जो खांद्यावर ठेवला होता.त्यांनी मांडा भोवती पाच फेर्या मारल्या.ढोल ताशांचा आवाज विशिष्ट लयीत होत होता.अचानक ते गडे  थरथरू लागले.सारे गडे..हू..हू...हूं करत आवाज करूलागले.काही क्षणात सारे गडे सुसाट धावू लागले.त्या पाठोपाठलोक धावत होते.गडे एवड्या वेगाने धावत होते की त्यांची पावलं इंचभर जमीनीच्यावर असल्यागत वाटत होती.ते एकमेकांना किंवा वाटेतल्या माणसांना जराही धडकत नव्हते.जणू कुणी अदृश्य शक्ती त्यांना वाट दाखवत होती. मी ही त्यांच्या पाठी मागून धाव घेतली.सगळे गडे दहा पंधरा मिनिटात एका झाडाखाली असलेल्या व्यवस्थित बांधकाम केलेल्या घुमटीजवळ पोहचले.घुमटीच्या आत असंख्य करे(बुडकुल्या),काही प्राणी तर हाता व पायाचे आकार असलेल्या छोट्या मातीच्या वस्तू होत्या.या वस्तू  आंगवणीच्या होत्या व मागणी पूर्ण झाल्यामुळे देवाला अर्पण केल्या होत्या.गड्यांनी त्यातली एक एक वस्तू उचलली .त्याचवेळी समोरच्या टेकडीवर एक मशाल पेटली.सगळे लोक ओरडले.काही क्षणांत तिथून दोनशे मीटरवर पुन्हा मशाल दिसली. मध्ये काही क्षण गेले अचानक माझं लक्ष घुमटीच्या पाठीमागे असलेल्या शेताकडे गेल.मी दचकलो.होय...तो समोर उभा होता...देवचार...?गावचा राखणदार .. !काळा कभिन्न चेहरा...मोठाले पांढरे डोळे...डोईवर मुंडासे...हातात चूड ती क्षणभर पेटली व विझली.मी संमोहित झाल्यासारखा एकटकतिथे पाहत होतो.अचानक त्याची व माझी नजरा नजर झाली.ते मोठाले डोळे गरगरा फिरले....माझ्यावर स्थिरावले.ते डोळे काहीतरी मला सुचवतात अस मला वाटले.माझ्या आणखी एक गोष्ट लक्षात आली.ती म्हणजे त्या व्यक्तीचे फक्त कमरेच्या वरचे शरीर दिसत होते.बाकी सारे शरीर हवेत विरल्याप्रमाणे गायब होते. माझ्या प्रमाणे  किती जणांना तो दिसला होता कोणास ठाऊक.दोन एक मिनिटानंतर ती आकृती नाहीशी झाली.   गडे वळून पुन्हा सुसाट धावत सुटले.ते सरळ मांडावर गेले.लोकांसोबत मी ही धावत सुटलो. होळी जवळ सगळ्या वस्तू ठेऊन त्यांनी मांडाला पाच फेऱ्या मारल्या.त्यांना देवीचे न्हावन (तीर्थ ) पाजण्यात आले.सर्व शांत झाले.अंगात आलेला संचार थांबला.बेचाळीस पैकी अडतीस गडे परत आले होते.तीन गड्यांना राखणदाराने लपवले होते.         काही वेळाने पुन्हा ढोल वाजू लागले. पुन्हा गड्यांच्या अंगात आले.प्रत्येक गड्याने अचूक आपण उचलून आणलेला करा उचलला .प्रथम सगळे करे जागेवर जसे होते तसे ठेवले गेले.आता सर्व लपवलेल्या गड्यांना शोधायला निघाले.बघता बघता सगळे डावीकडच्या डोंगराकडे पळू लागले. लपवलेल्या गड्यांना शोधत होतै.एक गडा एका मोठ्या झाडाच्या मुळात निपचित पडलेला मिळाला.खर तर तेथून काही क्षणांपूर्वीआम्ही काहीजण गेलो होतो त्यावेळी तिथे काहीच नव्हतं.मग हा बेशुद्ध अवस्थेत पडलेला गडा तिथे आला कुठून?दुसरा गडा एका घळीत सापडला.दोन्ही गडे ना हलत होते ना बोलत होते.जणू ते या दुनियेत नव्हतेच!दोघा दोघांनी त्यांना खांद्यावर उचलून घेतलं.यात तिसरा लपवलेला गडा खूप प्रयत्न करून सापडेना . रात्रीचे जवळ जवळ अडीच वाजून गेले होते." गेल्या दहा वर्सान असा घडला.लिपयलेलो गडो त्याच दिसां मेळाक नसलो.पण पयल्यान एखांदो गडो तिसर्या दिसा गावा.तेवा काळजी कश्याक  करतास?राखणदार गडो शोधान दितलो .चला"जाणते घाडीआजोबा ( मानकरी) म्हणाले.सगळे फिरून मांडार आले. त्या निपचित पडलेल्या दोन गड्यांना न्हावाण घातल्यावर ते अगदी ठणठणीत बरे झाले.खरं तर मला झोप येत होती.माझी व्यवस्था एका गावकर्याच्या घरात केली होती.मी माझ्या निवासस्थानी परतलो.घराचे मालक साठ एक वर्षांचे होते.ते ही माझ्यासोबत परतले होते." काका,तो न मिळालेला गडा सापडेल ना ?"" शंका घेऊ नका.  देवचार त्येका सुखरुप पावयतलो."गावकर्यांचा देवचार या संकल्पनेवर किंवा अनामिक शक्तीवरमनापासून विश्वास होता.मी जास्त काही बोललो नाही गपचुप माझ्या खोलीत शिरलो.खिडकीलगत असलेल्या बेडवर मी लवंडलो.गरम होत होतं म्हणून मी खिडकी उघडली.बाहेर सुंदर चांदणं होत.पहाटेचे तीन वाजून गेले होते. माझं लक्ष समोरच्या शेतात असलेल्या डेरेदार झाडाकडे गेलं. मी प्रचंड हादरलो.माझ अंग थरथरू लागलं.तो ..तो..तिथे उभा होता. मघा दिसलेला राखणदार ! आता तो पूर्ण दिसत होता.सात फूटापेक्षा उंची...भव्य कपाळ..गलेलठ्ठ गाल....त्यावरभरदार मिशा मोठे चमकदार पांढरे डोळे ...काळे शरीर...कमरेला  पांढरे शुभ्र धोतर...अंगात काळी बंडी...पाठीवर घोंगडं...उजव्या हातात चूड डाव्या हातात लांब पांढरी काठी...मशालीच्या प्रकाशात मला दिसल्या त्या  पायातल्या भल्यामोठ्या वहाणा...त्याच लक्ष खिडकीकडे म्हणजेच माझ्याकडे होत.मी हात जोडले.सवयीप्रमाणे डोळे क्षणभर बंद झाले.डोळे उघडले तो समोर कुणीच नव्हते.मला वाटलं मी काही क्षण भ्रमीत झालो होतो. पण तेवढ्यात दूर डोंगरावर पुन्हा धगधगती चूड दिसली.मी झटकन खिडकी बंद केली (सदर कथा  काल्पनिक आहे.कुणाची श्रध्दा दुखवण्याचा किंवा अंधश्रध्देला खतपाणी घालण्याचा  उद्देश नाही.निव्वळ मनोरंजन एवडाच उद्देश आहे.) ----------****---+++.  ----------*****.

...+++++.........भाग १ समाप्त बाळकृष्ण सखाराम राणे सावंतवाडी

मुखवटे ( गूढ कथा - बाळकृष्ण सखाराम राणे)भाग २  दुसर्या दिवशी सकाळी मला खूप उशीरा जाग आली.जवळ जवळ साडे आठ वाजले होते.मी थोडा खजील झालो.परक्या घरात एवढं उशिरा उठणे बरोबर नव्हते.पण दोन दिवसांच जागरण..व काल रात्री बघितलेली ती व्यक्ती यामुळे झोपच येत नव्हती.कालची आठवण झाल्याबरोबर पुन्हा एकदा अंगावर गार शिरशिरी आली.मी तोंड धुवून बाहेर आलो. परबांचा मुलगा  मुंबईत रेल्वेत कामाला होता तो  व्हरांड्यात बसला  होता.रजा टाकून  तो खास होळीसाठी आला होता.काल त्याच्याशी फारसं बोलणं झालं नव्हतं." या, ...कालचा गड्यांचा खेळ बघितलात ?" त्याने विचारले." होय. खरच विलक्षण आहे.गर्दी पण प्रचंड होती."मी पहाटेची घटना सांगणे टाळले." तुमचं पुरातन वस्तूंच संग्राहलय आहे असं बाबा म्हणत होते."" हो.मी पुरातत्त्व विज्ञानाचा पदवीधर आहे.मला प्रचंड आवडही आहे." मी म्हणालो. गप्पा - गोष्टी करता करता नाष्टा झाला.आज रात्री कालच्या प्रमाणे कार्यक्रम होता.आज गडे दुसर्या घुमटी कडे जाणार होते.तर उद्या म्हणजे होळीच्या चवथ्या दिवशी  गडे   स्मशानभूमीत जाणार होते." काल लपवलेला पण न मिळालेला गडा कोण हे कळाले काय.?" मी सहजपणे विचारले." नाईकांचो बाबी आशिल्लो.वास्कोत कस्टम ऑफिसर असलो तो!" परबांनी सांगितले." आज ते मिळतील?"" आज नाही तर उद्या मिळणारच.पण हे खूप वर्षांनी घडलं."परबांचा मुलगा म्हणाला. मी  तयारी करून पुन्हा बाहेर पडलो. दोन्ही देवळात जाऊन दर्शन घेतले. मी गेले दोन दिवस जे बघितले त्यावर विचार करत होतो.काही गोष्टी विश्वास ठेवण्या जोग्या नव्हत्या.पण जे दिसलं ते नाकारता येत नव्हतं. त्यानंतर मी सरळ, काल मला खिडकीतून जिथे देवचार सदृश व्यक्ती दिसली होती त्या ठिकाणी गेलो.मी तेथल निरीक्षण केलं. तिथे धुळीत सुमारे एक फूट लांबीचे अस्पष्ट चप्पलाचे ठसे दिसले.मी खांद्याला लटकवलेल्या बागेतून  टेप काढली व लांबी रुंदी मोजली.त्याची लांबी एक फूट व रुंदी मध्यावर अर्धा फूट  होती.हा खचितच मानवी पाय नव्हता.मी माझ्या कॅमेऱ्यात त्या पावलाचा फोटो घेतला. हे सगळं करताना एक अनामिक भिती मनात होती. इथेच पाठीमागे तो डोंगर होता.जिथे मला शेवटी मशाल दिसली होती.मी त्या दिशेने चालायला सुरुवात केली.        मी करत होतो ते बरोबर की चूक ते समजत नव्हते.मी  चढ  चढत होतो. थोडी घसरणीची वाट होती.हळूहळू झाडी दाट होऊ लागली.मोठ मोठी रानझाडे सभोवार दिसत होती. मी पुढे सरकलो.तिथे दोन तीन भले मोठे खडक होते.त्यांना टेकून मी उभा राहिलो.थोडी धाप लागली होती.जवळचे पाणी पिऊन मी सभोवार नजर फिरवली.मी थोडा दचकलो.माझ्या-  पासून काही अंतरावर डावीकडे एक विदेशी माणूस बहुधा नायजेरियन असावा....एका खडकावर बसला होता.       मी कॅमेरा त्याच्यावर स्थिर केला...झूम करून मी बारकाईने निरीक्षण करु लागलो.मुळातच त्याच तिथे असणे हे संशयास्पद होते.त्याने खिशातून एक बॉक्स काढला. मी शूटिंग सुरू केलं होतं. त्या बाॉक्समधून त्याने काहीतरी बाहेर काढलं.ते पाहून मी जवळ जवळ नि:शब्द झालो. त्याच्या हातात वितभर लांबीचा छोटा साप होता. उजव्या हाताने त्याने सापला पकडले व डाव्या हाताच्या दंडावर त्याने त्या सापाचा दंश केला.ती  बच नागीण होती.अतिशय विषारी अशी ! त्याने तीला पुन्हा बॉक्स मध्ये बंद केले.मला वाटल तो थोड्या वेळात तडफडून मरेल.त्याने दीर्घ श्वास घेतला.काही क्षण गेले.अचानक तो हलू लागला.हात व पाय झाडत तो बरळू लागला.दहा एक मिनिटं तो असा मरण यातना झेलत होता.पण नंतर त्याने शरीर ताणले.विचित्र आवाज करत तो तिथल्या दगडावर बसला.तो मेला नाही किंवा बेशुद्धही पडला नाही.उलट नशेत असल्यासारखा उठून तो चालू लागला.  काही दिवसांपूर्वी मी एक आर्टिकल वाचल होत.ज्यात काही लोक ज्यांना अमली पदार्थांची नशा येत नाही ते नशा येण्यासाठी सापाचा दंश करवून घेतात अस लिहिल होत.हे विलक्षण व थरारक होत.जीवही जाऊ शकत होता.तो नायजेरियन आता पुन्हा डोंगर उतरू लागला.माझे डोके गरगरू लागले.हा इसम ह्या गावात उत्सवावेळी अशी खतरनाक नशा का करत होता.गोव्यात अशा प्रकारची नशा केली जाते का?हा प्रश्न मनात उभा राहिला.मी कॅमेरा बंद केला व खाली उतरू लागलो.   मी खाली गावातल्या मुख्य रस्त्यावर आलो.दुपारची वेळ होती.काही सोंग (तोंड रंगवून किंवा मुखवटे घालून नक्कल  करणे)आयनाच्या बायना , घेतल्यावाचून जायना' असं म्हणत शबय मागत होती. गावात राधा - कृष्णाचे खेळे चालू होते. मी चहा पिण्यासाठी एका हंगामी हॉटेलमध्ये शिरलो.सात ते आठ जण तिथे होते.त्यात एक हिप्पी जोडपं होतं.माझ्या समोरच  दणकट शरीराच्या दोन    व्यक्ती बसल्या होत्या.पस्तीस एक वर्षांचे ते असतील.साध्या वेषात होते.पण त्यांच्या खिशाला पेन होत.तसच छोटी डायरी असावी असं वाटतं होतं.त्यांच्या एकंदर वेषावरुन ते पोलीस किंवा मिलिटरीतील ऑफिसर असावेत असा मी तर्क केला.ते माझ्याकडं रोखून पाहत होते." तुम्ही होळी बघायला आलात?" त्यातल्या एकाने मला विचारले." हो! " मी खांदे उडवत म्हणालो."कुठून आलात."" महाराष्ट्रातून .मला संशोधनाची आवड आहे. त्यासाठी मी सगळीकडे फिरत असतो. तुम्ही गुप्त पोलीस आहात?" मी सरळच विचारले.दोघेही दचकले. " कश्या वरून तुम्हाला असं वाटल?" दुसर्याने विचारले." तुमची शरीरयष्टी...म्हणजे रूंद खांदे...रूंद छाती...करारी नजर... बसण्याची पद्धत... त्यांच्या मनगटावर असलेला जखमेच्या व्रण .... सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या मोबाईलवर आत्ता आलेला मुंबई पोलिस स्टेशनचा टेक्स्ट मेसेज... क्षणभर स्क्रीन चमकला तेव्हा ते माझ्या लक्षात आले." मी म्हणालो." तुम्ही तर दस नंबरी निघालात. हो, आम्ही मुंबई पोलीस आहोत.खास कामगिरी वर आलोत. मी विश्वास सबनीस...आणि हा व्रण असलेला शरद म्हात्रे एका एन्काऊंटर वेळी त्याच्या हाताला गोळी लागली होती." विश्वास हळू आवाजात म्हणाला.मला वाटलं मी विश्वासला यापूर्वी बघितलंय.मी आठवू लागलो..." विश्वास सबनीस ! तुम्ही कोल्हापुरात राजाराम कॉलेजमध्ये होता?""होय, २००९ सालात ... मराठी विषय माझा.. आणि तुम्ही?"" मी पण २००९ साली बी.ए.झालो सायकॉलॉजी व नंतरएम .ए.पुरात्तव विषय घेऊन.पण तू त्यावेळी कविता वैगेरे करायचाय आणि अचानक हे सी.आय.डी . वैगेरे?तो मस्त पैकी हसला." या ठिकाणी एक आंतरराष्ट्रीय ड्रग्स व्यवसाय करणारी टोळी घुसलीय आम्ही त्यांच्या मागावर आहोत." शरद म्हात्रे म्हणाले. ते एकूण मी विचारत पडलो. मी त्यांना काही वेळा पूर्वी जे बघितले होते ते सांगितले." तो नायजेरियन म्हणजे सुलेमान बेग असणार.खतरनाक आहे,  आठ मर्डर... बरीच अपहरण... काही रेप असे शाबित न झालेले गुन्हे त्याने केलेत. जगभर त्याचा धाक आहे.कूंग फू पटू आहे.""तुम्ही लोकल पोलिसांची मदत का घेत नाही.?" मी विचारले" सध्या नको...ही टोळी फक्त ड्रग विकायला नाही आलीय तर त्यांचा आणखी काहीतरी हेतू आहे .आम्हाला नेमकं ते शोधायचे आहे." विश्वास म्हणाला." या पारंपरिक व सांस्कृतिक गडे खेळात हे खतरनाक आंतर राष्ट्रीय गुन्हेगार काय करताहेत? मी विचारले." येत्या दोन दिवसात कळेलच.तू आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा." आम्ही तेथून उठलो. मी परब यांचं घर गाठलं.----+------------+---------+-----------+---------+-----+----+सायंकाळी मी चहा पीत बाहेर खळ्यात बसलो होतो. सोबत परब होते.त्यांचा मुलगा बाहेर गेला होता. तेवढ्यात एक आलिशान कार समोरुन देवळाच्या दिशेने गेली.त्या पाठोपाठ एक पोलीस कार होती." डिसोजा आयलो वाटता!" परब म्हणाले.मी त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिले." गोंयचो पोलीस महासंचालक...याच म्हयन्यात रिटायर्ड झालो."" देवासाठी...आलेत?"" कित्ये कळपाचे."     रात्री मी , परब व त्यांचा मुलगा मांडाच्या ठिकाणी गेलो. आज सुध्दा अतोनात गर्दी होती. नमन...गार्हाण झाले.गड्यांच्या अंगात अवसार संचार झाला.ते सगळे शेताच्या व डोंगराच्या दिशेने धावू लागले.आम्ही पण पाठिमागून धावू लागलो.त्या गडबडीत मी भलतीकडेच ढकलला गेलो. अचानक डाव्या बाजूला मशालीचा प्रकाश दिसला तर काही क्षणांनंतर उजव्या बाजूला प्रकाश दिसला. पुन्हा पाच मिनिटांत डोंगराच्या टोकावर मशाल दिसली.लोक ओरडत धावत होते.मी सरळ डोंगरमाथ्यावर जिथे मशालीचा उजेड दिसला होता त्या दिशेने धाव घेतली.चांदण होत पण झाडांमुळे पायाखाली फारसं दिसत नव्हतं.मी  एका अनामिक ओढीने रानात शिरलो होतो.मी बराच पुढे गेलो होतो.मी थांबून आजूबाजूला पाहिले.धूसर चांदण्यात गड्यांना पाहण्यासाठी धावणारे लोक दिसत होते.तिथे एक अजब शांतता असल्याचे मला जाणवले.इथे कसलाच आवाज येत नव्हता.वारा सुध्दा थबकला होता.मी गोंधळलेल्या अवस्थेत  उभा होतो.. अगदी एकटा!मी परतण्याचा विचार करत होतो.तेवड्यात माझ्या खांद्यावर कुणाचातरी जड हात पडला.मी थरारलो...घश्याला कोरड पडली. रात्री एक ते दिड वाजता या रानात माझ्या खांद्यावर हात ठेवणारा कोण होता? एखादा  श्रध्दाळू... एखादा वार्ताहर की ड्रग्स टोळीतला कुणी ? भितीमुळे माझे पाय थरथरू लागले. त्या अवस्थेतही मला एक जाणवलं कीत्या हाताची बोटं जाड व लांब होती." घाबरु नकोस. माझ्या मागून..ये."एक करडा स्वर माझ्या कानात शिरला. क्षणभरातच मी संमोहित झालो.माझ्या खांद्यावरच्या हात बाजूला झाला.मी वळलो. माझ्या समोर...तो...तो..कालचाच राखणदार...म्हणजे देवचार पाठमोरा उभा होता.अगदी दोन चार फूटांवरआपल्या नेहमीच्या वेषात ...भव्य व दिव्य अश्या स्वरूपात.याक्षणी तरी माझ्या मनात कोणताही भिती नव्हती पण मी मंत्रमुग्ध झाल्यागत निश्चल उभा होतो.राखणदार पुढे चालू लागला तसा मी यंत्रवत त्याच्या पाठीमागून चालू लागलो.मी भानावर आलो होतो.पण राखणदाराची आज्ञा टाळणे शक्य नव्हते. मशालीच्या उजेडात.... काठीच्या धंगुरांच्यामंद आवाजात मी खालीही न बघता सहजपणे चालत होतो.******--------******--------*******-------*****-----*****---भाग २ समाप्त.( कथा पूर्णतः काल्पनिक आहे.)बाळकृष्ण सखाराम राणे