१.अवकाश आणि पृथ्वीची निर्मिती.
खरोखरच सर्वात आधी तेथे देव होता. प्रकाश,अंधार , स्वर्ग, पृथ्वी असण्या अगोदर...म्हणूनच आपण त्याला सनातन प्रभू प्रमेश्वर म्हणतो...सुरवातीला त्याने अवकाश व पृथ्वी असे निर्माण केले.
त्याने मानवाला मातीने निर्माण केले. शब्दाने त्याने पृथ्वी आणि त्यावरील जिवन निर्माण केले . समुद्राला प्रभूने सिमा घातल्या, त्याला आपण सोप्या भाषेत बिच म्हणतो.किनारा, जिथे निवांत बसता येत... काही काळाचा आनंद अनुभवता येतो .प्रत्येक संसारीक गोष्ट असीच आहे म्हणून उपदेशक म्हणतो सगळेच व्यर्थ आहे ....मग चिरकाल टिकणारा आनंद भेटत नाही काय?तुम्ही प्रभू येशू वरती कधी विश्वास ठेवला आहे काय?चिरकाल आनंद त्याच्यापासून भेटतो. तो सुख दुःखात साथी होती . कष्ट समयी सांत्वन देतो...असे कित्येक उदाहरणे भेटून जातील...प्रेषीतांना बघा , किती कष्ट आणि दुःख सोसले प्रभूच्या नावात पण , तरीही त्यांचा आनंद न ओसरता वाढला...आम्ही प्रभूचे कष्ट अंगावर घेतले...प्रभू येशू म्हणतो " कोणी जर माझ्या नावाने तुमचा छळ केला तर , आनंद करा , आनंदाने उड्या मारा कारण, स्वर्गात तुम्हाला मोठे प्रतिफळ आहे."जेव्हा लोकांनी त्यांना मारले ते तर आनंद करत बाहेर आले. कारण प्रभूसाठी आम्ही दुःख सोसले...
असे कधी होते का ?
पण हे खरे आहे!आताच्या आयुष्यातही तुम्हाला पुष्कळ उदाहरणे भेटून जातील...
तर देवाने आपल्या शब्दाने आणि हाताने पृथ्वी घडवली. खरे तर सर्व सृष्टी त्याची निर्मिती आहे आणि पवित्र शास्त्र म्हणजेच बायबल सांगते देव कधिच आराम करत नाही. तो लोकांस रोजची भाकर पुरवतो, रोग्यास आरोग्य देतो. आपल्यासाठी आता हे सर्व बघणे सामान्य आहे पण , जसे जसे प्रलोभने वाढत आहेत . लोकांचा विश्वास कमजोर होत चालला आहे.त्यांच्या मनात अंतःकरणात दुष्टता ठाण मांडून बसली आहे.वाईट विचार असे काही येतात की , हे माझेच घर आहे.
तुम्हाला ठाऊक नाही काय पवित्र शास्त्र काय सांगते," तुमचे शरीर पवित्र आत्म्याचे मंदीर आहे ."तुमचे शरीर देवाचे घर आहे पाप आणि वाईटाचे नाही.जर तुम्ही ख्रिस्ती असूनही पाप करत राहणार तर , तुमची स्थिती खुप वाईट असेल...आपल्या संपूर्ण मनाने आणि हृदयाने, संपूर्ण अंतःकरणाने प्रभूला शरण जा तर , खरोखरच तुझे तारण होईल आणि न्यायाच्या दिवसी तुम्ही लाजवले जाणार नाहीत...प्रभूवरती विश्वास ठेवने म्हणजे हेच की त्याला संपूर्णपणे शरण जाने.प्रभू येशू म्हणतो," जो माझ्यावरती विश्वास ठेवतो तो तारेल."
जर तुम्ही देवाशी प्रामाणिक आहात तर , तो सर्व सामर्थ्य आहे. फक्त त्याला संपूर्ण अंतःकरणाने शरण जा ?तारण तुमच्याजवळ आहे .ज्याने शब्दाने ही सृष्टी निर्माण केली तो तुम्हाला तारण्यास सर्व सामर्थ्य आहे.
मग आताच तुमच्या हृदयात, मनात , आत्म्यात प्रभूला जागा द्या...उठा आणि हे करा आणि सर्वकाळचा आनंद आणि शांती व तारण मिळवा....म्हणजे न्यायाच्या दिवसी तुम्हाला लज्जीत व्हावे लागणार नाही....
Hallelujah hallelujah hallelujah 🙏 🙏 Glory to the God 🙏
२. पाप.
मी पापी नाही , मी नितीमान आहे . मी आयुष्यात कधीच पाप केला नाही . असे म्हणणारा तुम्हाला कधी आढळेल काय?जेव्हा प्रभू येशू ने त्या घोळक्यास म्हटले की, ज्याने कधी पाप केले नसेल अस्याने दगड उचलावा पण , तो संपूर्ण घोळका निघून गेला . ज्यात परूशी, नियम शास्त्राचे शिक्षक आणि याजकही होते . ते आठवड्यातून दोनदा उपवास करत असत , दशमांश देत असतं, दहा आज्ञा पाळत असतं.अस्यातील कोणीच पुढे आला नाही .तर तुम्ही स्वतः विषयी निश्चित असू शकता काय ?
दावीद राजा म्हणतो माझ्या आईने पापाने माझी गर्भधारणा केली होती . म्हणजे गर्भातच पापी बीज पेरले गेले होते .ह्याची सुरवात ऐदेन बागेतून झाली होती . देवाची अवाज्ञा करून मनुष्याने जे पाप केले , जो विद्रोह केला. त्याच पापाचे बीज पिढोणपिढ्या मानव आपल्या आत घेऊन चालत आहे . ही एक अनुवांशिक रोगराई म्हंटली तरी चालेले .ह्याची बदौलत माणूस चांगले नाकारून वाईट आणि नाश निवडतो. अधिक सुख सुविधाही नाशाकडे घेऊन जातात.
जसे त्या गरीब भिकारी लाजर आणि श्रिमंत मनुष्याची गोष्ट होती .तुम्ही आधीच सर्व सुखसुविधा उपभोगल्या तर नंतर काही उरत नाही पण , जर तुम्ही वंचित राहलात तर तुम्हाला मिळेल.प्रभू म्हणतो जे आता शोक करतात ते नंतर आनंद पावतील , जे रडतात ते हसतील .तसेच जे आता हसतात त्यांना दुःख होवो कारण ते नंतर रडतील आणि जे आता आनंद करतात ते दुःखी होवोत कारण नंतर ते दुःखी होतील.
लाजर आणि त्या श्रिमंत मनुष्याची गोष्ट ह्या विषयापासून फार दूर नव्हती .
पाप मनुष्याला देवापासून दूर करतो , जसे ऐदेन बागेत मनुष्याने पाप केले आणि त्याला देवाच्या सहवासापासून दूर केले , आज्ञा भंग करणाऱ्या देवदुतांना स्वर्गातून काढण्यात आले .पाप मृत्यूस कारणीभूत होतो . पापाचे फळ मृत्यू आहे . प्रभू म्हणतो जर तुम्ही पच्छताप केला नाही तर तुम्ही मराल पण , जर कोणी पच्छताप केला आणि आपले वाईट मार्ग बदलले तर तो जगेल.पाप दुःखासकारणीभुत होते. देवाचा क्रोध अस्यावर पेटतो. पापापासून मुक्ती मिळवण्याचा एकच मार्ग आहे . मग मार्ग शोधावा तर , कोणता ?प्रभू येशू , हा एकमेव मार्ग आहे..मार्ग, सत्य आणि जिवण मीच आहे असे प्रभू म्हणतो.पापापासून मुक्त होण्याचा मार्ग, देव पित्याकडे जाण्याचा मार्ग , मुक्ती मिळवण्याचा मार्ग , स्वर्ग मिळवण्याचा मार्ग, अनंत जिवण मिळवण्याचा मार्ग , नरकातून सुटका मिळवण्याचा मार्ग , देवाचा क्रोध ,न्यायापासून वाचण्याचा मार्ग ....प्रभू हा एकच मार्ग आहे .ही वाट सरळ नाही .पवित्र शास्त्र सांगते नशाकडे जाण्याचा मार्ग हा रुंद , प्रशस्त आणि आरामदायी आहे पण जिवणाकडे जाणारा मार्ग अरूंद आणि कष्टमय आहे .प्रभूला स्विकारने म्हणजे स्वतःला नाकारणे . जगाच्या वासनांना नाकारणे . ज्यांचे जग आज आनंद घेत आहे . डोळ्यांच्या वासना पुष्कळ आहेत , प्रत्येक गोष्ट आता फक्त वासना बनुन उरली आहे , इथपर्यंत की , ज्याला मनोरंजन म्हणतात ते ही .जिवणाकडे जाणारा मार्ग तुमच्यावर दुःख आणू शकतो कारण , जेव्हा आपण प्रभूच्या नावाचा स्विकार करतो तेव्हा जग आणि त्याचे नियम व त्याच्या वासनांना नाकारतो मग , जगही आपला तिरस्कार करते . ह्यामुळे आपणावर दुःख सहन करण्याची पाळी येते .अंततः जो शेवटपर्यंत ह्यात टिकून राहतो तो आपला मुकूट आणि अनंत जिवन मिळवतो .
फक्त विश्वास ठेवा आणि उद्धार पावा . किती सोपे आहे ना ?पण मार्ग अरूंद आणि दुःखाने भरलेला आहे हे लक्षात ठेवा तरीही , दुःख सहनात देवाची शांती ,दया , आनंद तुमच्यावर पाखर करून असते .
प्रभू म्हणतो जे देहाचा नाश करू शकतात त्यांना घाबरू नका . त्यांना त्यापलीकडे काहीच करता येत नाही . पण जो तुमच्या शरीराचाही आणि नरकाच्या अग्नीत आत्म्याचा ही नाश करू शकतो त्याचे भय बाळगा.
पाप ज्याची मजदूरी मृत्यू व न्याय आहे . ह्यापासून मुक्ती मिळवण्याचा एकच मार्ग आहे प्रभू येशू . खरे सांगतो ह्या अवकाशाखाली उद्धार मिळवण्याचा दुसरा कोणताच मार्ग नाही .उशीर आहे तर फक्त निवडण्याचा, जर सध्या नाकारले तर , कुणास ठाऊक नंतर असी वेळ येईल किंवा नाही कारण उद्या काय घेऊन येईल कोणास काहीच ठाऊक नाही.
तर हे आव्हान आहे आजच मार्ग निवडा जरी थोडे दुःख आले ह्या जिवनात तरी , नंतर तुम्हाला न्याय , नरक हे सर्व अनुभवावे लागणार नाही . होय थोड्यासा दुःख सहानंतर मोठा आनंद आहे .
धन्यवाद 🙏 👍 💐 💐
Praise the lord 🙏
Hallelujah hallelujah hallelujah hallelujah hallelujah hallelujah 🙏