प्रतापगडावरील उलटवलेली बाजी
प्रस्तुत लेखन प्रतापगडाच्या लढाईचे सृजनशील वर्णन असून, ते सैनिकी कमांडरांच्या दृष्टिकोनातून तयार केलेले आहे. याचा उद्देश एक संभाव्य व रोचक वृतांत सादर करण्याचा आहे, मात्र ही ऐतिहासिकदृष्ट्या अचूक किंवा अंतिम माहिती म्हणून पाहू नये. लढाईची वास्तविकता या लेखनापेक्षा वेगळी असू शकते, आणि वाचकांनी ऐतिहासिक संदर्भ समजून घेण्यासाठी विविध स्रोतांचा अभ्यास करावा, अशी विनंती आहे."
शिवाजी महाराजांवर असंख्य साहित्य उपलब्ध आहे, परंतु अफजलखानाच्या बाजूने रणनीतिक आणि लष्करी दृष्टिकोन तपासण्याचा प्रयत्न अभिनव आणि महत्त्वाचा वाटतो. शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्या संघर्षावर अशा लष्करी दृष्टीकोनातून विचार करणारे लेखन निश्चितच ऐतिहासिक विश्लेषणासाठी नव्याने विचार करण्यास प्रेरणा देतो. तो इतिहासातील असमान मांडणीला नव्या दृष्टीने तपासण्यास मदत करतो.
अफ़ज़लखानाची ही मोहीम लष्करी तयारीपेक्षा राजकीय डावपेच आणि दहशतीच्या खेळावर अधिक अवलंबून होती. तुळजापूरातील दहशतीची बातमी पसरवण्यासाठी काही मराठा हलकाऱ्यांना ढोल-तुताऱ्यांसह गावा-गावातून फिरवले. शिवाजीच्या कानावर ही माहिती पोहोचेल, यासाठी जाणूनबुजून ही दहशत पेरली गेली.
अफ़ज़लखानाच्या विजापूरहून प्रस्थानानंतरचे हे वर्णन त्याच्या मोहिमेची योजना, प्रवासाची दिशा, आणि राजकीय डावपेच उलगडून दाखवते. खानाचा प्रवास हा केवळ लष्करी मोहिमेपुरता मर्यादित नव्हता, तर त्यामध्ये मोठ्या राजकीय आकांक्षांचा समावेश होता.
खानाच्या सैन्याची वाटचाल हा केवळ गावो गावी नासधूस करणारा लष्करी संच नव्हता. वाटेतील मंदिरं, सराफ, आणि धनिकांवर केलेला जुलूम केवळ लूट म्हणून नव्हता, तर त्याद्वारे त्याने शिवाजीविरोधातील असंतोष वाढवण्याचा प्रयत्न केला. खानाने बजाजी नाईक निंबाळकरांना संपवून शिवाजीच्या निकटवर्तीयांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. हे राजकीय दडपशाहीचे ज्वलंत उदाहरण होते. प्रत्येक टप्प्यावर त्याने स्थानिक प्रशासनाला ताब्यात घेत, आपल्या सैन्याची संख्या आणि सामर्थ्य वाढवत ठेवली.
खानाच्या डोक्यात विजापूरच्या राजसत्तेवर कब्जा करण्याचे दूरगामी मनसुबे होते. शिवाजीचा पराभव हे त्याच्यासाठी या योजनांचा पहिला टप्पा होता. पुढे, पन्हाळा आणि कोकणातील महत्त्वाचे भाग ताब्यात घेऊन स्वतःचा दबदबा प्रस्थापित करायचा त्याचा विचार होता.
छत्रपती शिवाजी महाराज आणि अफ़ज़लखान यांच्यातील प्रतापगडाचा संग्राम हा भारतीय लष्करी इतिहासातील एक निर्णायक टप्पा आहे. या दस्तऐवजात लढाईचे विश्लेषण कमांडरांच्या दृष्टिकोनातून केले आहे. यात रणनीती, सैन्यरचना, नेतृत्व, आणि युद्धातील धडे यांचा सखोल अभ्यास आहे. या संग्रामाच्या पार्श्वभूमीपासून ते निर्णायक भेटीपर्यंतच्या घटनांचा तपशीलवार आढावा घेतला आहे. शिवाजी महाराजांच्या नेतृत्वशैलीचा आणि अफ़ज़लखानाच्या धोरणांचा सखोल अभ्यास करून, या लढाईतील महत्त्वाच्या टप्प्यांचा विस्ताराने अभ्यास केला आहे.
रणनीतिक पार्श्वभूमी- औरंगजेब दिल्लीचे तख्त मिळवायच्या गळेकापू स्पर्धेत गुंतला होता. कोकणपट्टीतील दुर्ग, व्यापारी जहाजांवर वाहतूक जकात हा कधी न आटणारा उत्पन्नाचा झरा होता. तो मिळवायला, ही संधी होती. अनुभव नसलेल्या राजास आपापसातील कलह मिटवणे तातडीचे होते. शहाजीचा धाकटा मुलगा सिवा बापाला जुमानत नव्हता. स्वतः चे किल्लेदार नेमून पुंडाई वाढत होती. उपाय होता की सिवाला मारून टाकणे. बडी बेगमनीने अफजलखानाला बोलावून मोहिमेची जोखीम दिली. सर्व तयारी झाल्यावर दरबारात अफ़ज़लखानानाने विडा उचलून मोहिमेची जबाबदारी स्वीकारली. सैनिकी आवेशात,' हे काम मला दिलेत म्हणजे फत्ते झाले आहे असे समजा' असे हात वर करून आश्वासन दिले.
अफ़ज़लखानाचे उद्दिष्ट: शिवाजी महाराजांचा पराभव करून कोकण व पन्हाळा ताब्यात घेणे आणि आपल्या सत्तेचा विस्तार करणे. त्याने आखणी करताना हवे ते सरदार, सैन्यदळ, दरबारातील गटबाजी, खर्चाचे बजेट, पावसाळी महिने या गोष्टींचा विचार केला. या मोहिमेच्या यशावर खानाची राजकीय प्रतिष्ठा अवलंबून होती. अफ़ज़लखानाची ही मोहीम लष्करी तयारीपेक्षा राजकीय डावपेच आणि दहशतीच्या खेळावर अधिक अवलंबून होती.
शिवाजी महाराजांचे उद्दिष्ट: संख्येने प्रचंड असलेल्या शत्रूला भौगोलिक परिस्थितीत दाट जंगल, भीषण पर्वतशिखरे ,याचा वापर करून युक्ती आणि चातुर्याने नामोहरम करणे, तसेच आपल्या लोकांच्या स्वातंत्र्यासाठी लढणे.
सैन्यरचना व मोहिम - खानाचे सैन्य निघताना हत्ती पुढे, हजारो घोडेस्वार बाजूला, तोफा मागे अशा रचनेत होते. भाषेच्यागरजे प्रमाणे मराठा सरदारांना लावले गेले. आपापल्या कबील्याप्रमाणे डोक्यावर मुंडाशी, मळखाऊ कपड्यात रस्त्याच्या रुंदीप्रमाणे घोळक्याने जात होते. त्यात सध्याच्या कवायतींचा रेखीवपणा नव्हता.
लूटमार व दहशत : पंढरपूरच्या मंदिरावर लूटमार करून धार्मिक भावनांना धक्का दिला, ज्यामुळे स्थानिक लोकांमध्ये संताप आणि भीती दोन्ही निर्माण झाले. वाट वाकडी करून तो स्वतः किंवा आपल्या कर्तबगार सरदारांना दूर वरच्या मंदिरांची नासधूस, बाजारपेठात लूट, करायला पाठवून रयतेला दहशतीत ठेवणे चालू होते. अनेक किल्लेदार आपापल्या सैन्यासह आपणहून अजीजीने हजर होत राहिले. आता शिवाजीचे खरे नाही हे धडधडीत दिसत होते. खानाने स्थानिक सरदारांना दबावाखाली आणून शिवाजींना अलग करण्याचा प्रयत्न केला. फलटणच्या बजाजी नाईक निंबाळकरांना जिवे मारण्याची धमकी दिली.