Love story is a mystery in Marathi Love Stories by Prajakta Kotame books and stories PDF | प्रेम कथा एक रहस्य

Featured Books
Categories
Share

प्रेम कथा एक रहस्य

निशाला आज जॉब वरून यायला जरा उशीर झाला आकाशने निशाला फोन केला निशाने फोन उचलला आकाश म्हणतो की कुठे आहे अजून एवढा उशीर का झाला निशा अहो पप्पा आज ट्राफिक खूपच होती ट्राफिक मुळे खूपच वेळ झाला आकाश बोलतो की बरं लवकर ये मग निशा म्हणते हो असे बोलू निशा फोन ठेवते व गाडी फास्ट चालवते मग निशा ट्राफिक मधून कशी तरी घरी पोहोचते घरी आल्यावर जेवण करते व कपडे चेंज करून झोपते तर निलेश ला आज जॉब ला सुट्टी होती त्याने आज दिवसभर आरामच केला व संध्याकाळी त्याने शेजाऱ्याच्या पार्कमध्ये फिरायचा प्लॅन केला व तो त्याच्या मित्रांसोबत पार्कमध्ये फिरून आला व मंग घरी आल्यावर हातपाय धुवून जेवण करून घेतले व मग जेवण केल्यानंतर झोपला निशा सकाळी पाचला उठली कारण तिला जॉब ला जायचे होते तिचा जॉब ची वेळ सकाळी आठची आहे त्यामुळे तिला लवकर उठून लवकर जायचे होते मग ती तिच्या गाडीने जॉब ला गेली निलेश जॉबला जातो त्याची वेळ नऊ वाजेची असते सकाळी निशा हे मूळची मदनपूरची असते


तर तिचा जॉब हा तिच्या गावापासून चार ते पाच किलोमीटर दूर असतो तर तिला रोजच जायला वेळ होतो ती बसला सांगते की एक तर ऑफिसला येण्याचा वेळ जरा लेट करा किंवा मला वर्क फ्रॉम होम काम करू द्या


मग तिला तिचा बॉस वर्क फ्रॉम होम म्हणून काम कर असे सांगतो हे एकूण तिला त्याचा खूपच आनंद होतो व ते दुसऱ्या दिवसापासूनच वर्क फ्रॉम होम काम करायला सुरुवात करते निलेश जॉब ला गेलेला असतो व त्याला ऑफिसमध्ये बॉस खूपच काम सांगतो व त्याच्यापुढे फाईलचा गठ्ठाच आणून ठेवतो त्यामुळे त्याला आज खूपच कामाचा लोड असतो व बॉसने त्याला तेवढे काम करायला दोन दिवस दिलेले असतात तेवढे तरी बरे तरी तो घरी गेल्यावर जागरण करून तेवढे काम पूर्ण करतो व दुसऱ्या दिवशी तो सर्व फाइल्स बॉसला देऊन टाकतो बॉस हे बघून खूपच शॉक होतो की जर याला सोडून मी दुसऱ्या कोणाला हे काम दिले असते तर दोन दिवसाचे चार दिवस काम पूर्ण केले असते पण याने तर दोन दिवस दिले तर एकाच दिवसात काम पूर्ण केले

बॉस - nice work nilesh

निलेश - thanks sir

बॉस - तू जाऊ शकतोस

निलेश - ok sir.

बॉसला मनोमन असे वाटले की अशा माणसाची खूपच गरज आहे


या ऑफिसमध्ये मग बॉस निलेश चे प्रमोशन करण्याचे ठरवतो जे की फक्त बॉसच्या मनात असते व बाकी कुणालाही माहीत नसते निशाचे वर्क फ्रॉम होम चालू असते ती त्यातच खूप आनंदी असते एक दिवस निलेश ला ऑफिसला सुट्टी असते तर निशा ही तर घरीच असते कारण वर्क फ्रॉम होम असते तिला तर ती पण तिच्या कामाला ब्रेक देते व सुट्टी घेते निलेश ला तर आधीपासूनच फिरायला खूप आवडते म्हणून तू नाशिक मधील कामिनी या हॉटेलमध्ये जेवणासाठी जाण्याचा प्लॅन करतो व निशा ला रोज घरी बसून कंटाळा आला होता तर तिनेही बाहेर जवळच्या हॉटेलमध्ये जाण्याचे ठरवते तर ते कामिनी ह्याच हॉटेलमध्ये जाण्याचे ठरवते निलेश हा त्याच्या मित्रांबरोबर असतो तर निशा ही तिच्या मैत्रिणींसोबत असते मग दोघेही त्या हॉटेलमध्ये जातात पण वेगवेगळे जातात मागे पुढे जातात दोघी त्यांच्या त्यांच्या फ्रेंड्स सोबत जेवण करतात जेवण होते व मग निलेश हा बेसिंग मध्ये हात धुण्यासाठी जातो व तिथेच निशा ही येते व दोघेजण एकमेकांकडे बघत असतात जवळपास दहा ते पंधरा मिनिटे तरीपण बोलत काहीच नाही कारण ते एकमेकांना ओळखत नाही मग दोघांनाही असे वाटले की मी याला बघितले व हिला बघितले असे हे दोघे घरी गेल्यावर खूपच विचार करतात व त्यांना त्यावर काहीच आठवत नाही व मग दोघेही झोपतात निशाला एक स्वप्न पडते पण ते अस्पष्ट असते ते तिला समजत नाही सेम तसेच निलेशलाही झाले मग असेच होऊ लागले त्यांना रोजच ते स्वप्न पडते व ते अस्पष्ट दिसते व काहीच समजत नाही


मग त्यांना हे आठवते की ज्यावेळेस मी त्या मुलाला किंवा मुलीला बघितल्यापासून असे होत आहेत तर मग त्या दोघांनाही असे वाटते की आम्ही दोघे परत भेटलो पाहिजे असे का होते ते विचारू निलेश व निशाला दैव शक्ती प्राप्त असते जन्मताच पण त्याचा या आधीच कधीच वापर झालेला नसतो त्यामुळे त्यांना असे वेगळेच वाटत असते व त्यांनाही ते माहीत नसते


मग ते अचानक अशाच एका दिवशी एका मॉलमध्ये समोरासमोर येतात व दोघेही एकमेकांना बघून थोडे आनंदी व थोडे शॉक होतात त्या दोघांनाही देवी कालिका एकत्र करण्याच्या मागे असते


म्हणजेच त्यांना मिळून पुढे मोठ्या राक्षसांना किंवा आत्म्यांना किंवा वाईट शक्तींना मारायचे असते देवी कालिका ने निलेश व निशा ला मागच्या जन्मीच वरदान दिले होते व तेच त्या दोघांना आठवत नव्हते व तीच आठवण देवी कालिका निलेश व निशाला करून देत होती व या सर्व शक्ती देवीने त्यांना दिल्या आहे ते आठवणी आधी त्यांना ते मागच्या जन्मी कोण होते व मागच्या जन्मात काय करत होते व निशा व निलेश यांचा एकमेकांशी काय संबंध होता हे आठवायचे होते व मग त्यांना देवीने दिलेल्या शक्ती त्यांना आपोआप आठवणार होते ज्यावेळेस एका मॉलमध्ये ते मिळतात तर ते एकमेकांना नाव विचारतात गाव विचारतात.

निलेश - hi

निशा - hello

निलेश - आपण मागच्याच वेळी एक हॉटेलमध्ये भेटलो होतो तुम्हाला ते आठवत का

निशा - हो

निलेश - तुझे नाव काय आहे

निशा - माझे नाव निशा व तुझे नाव काय आहे.

निलेश - मी निलेश

निशा - तू कुठे राहतो

निलेश - मी जाते गावचा राहणारा आहे तू कुठे राहते

निशा - मी प्रॉपर मदनपूर या गावची राहणारे आहे

निलेश - मला ना तुला एक विचारायचे आहे व थोडे बोलायचे पण आहे

निशा - हो बोल ना

निलेश - आपण मॉलमध्ये उभे राहून बोलण्यापेक्षा एखाद्या हॉटेलमध्ये बसून बोलू

निशा - हो चालेल

मग ते दोघेही वरच्या शेजारी असलेल्या एका छोट्याशा हॉटेलवर बोलण्यासाठी जातात


हॉटेलमध्ये गेल्यावर तिथे हॉटेल मॅनेजर येतो व यांना विचारतो की तुम्हाला काय पाहिजे आहे तेव्हा निलेश म्हणतो की दोन चहा मॅनेजर म्हणतो ओके मग थोड्याच वेळात वेटर चहा घेऊन येतो तोपर्यंत निलेश व निशा बोलत असतात


निशा बोलते की बोल ना तुला काय बोलायचे आहे निलेश म्हणतो की आपण त्यावेळेस हॉटेलमध्ये भेटलो होतो व फक्त एकमेकांकडे बघितले होते तर मला वाटते की मी तुला कुठेतरी बघितले आहे पण मला ते आठवत नव्हते व त्याच रात्रीपासून अजून पर्यंत मला एकच स्वप्न पडत आहे व ते अस्पष्ट दिसत आहे व त्यात काही दिसत नाहीये फक्त काळी रात्र व त्या चंद्र दिसतोय त्या दिवशी अमावस्या किंवा पौर्णिमा आहे असे वाटते आणि स्वप्न काही नाही समजत आपोआप निघून जाते व काहीच समजत नाही निशा त्याचे बोलणे ऐकत असते व ती एकता एकता आश्चर्य तिला वाटते कारण जे तिच्यासोबत घडतंय ते त्याच्यासोबत घडतंय निशा बोलते की हो मला पण असेच त्या दिवसापासून होत आहे मला पण काही समजत नाहीये मला तरी वाटते की आपण एखाद्या तांत्रिक केव्हा एखाद्या व्यक्तीला सांगावे म्हणजे आपल्याला त्यात काही उलघडेल निलेश बोलतो की हो चालेल तू जे म्हणते ते करून बघू


असे करून ते एकमेकांना बाय करतात व घरी जातात व ते त्यांच्या आई-वडिलांना घडलेली घटना सांगतात मग त्यांच्या आई-वडिलांना आहे ऐकल्यावर थोडी भीती वाटते पहिल्यांदा मग तिथे त्यांना मदत करायला तयार होतात व मग निशाला विशाखा म्हणते की अगं मला ना एक असा व्यक्ती माहित आहे की तो या गोष्टीतून आपल्याला बाहेर काढू शकतो किंवा गोष्टी उलगडून का होईना थोडी त्याबाबतची माहिती देऊ शकतो निशा बोलते अरे वा आई खूपच चांगले मग कोण आहे तो व्यक्ती व कोठे राहतो मग विशाखा म्हणते त्याचे नाव सुरेश आहे तो ना आपल्याच मदनपूर गावातील माणूस आहे ऐकले आहे व भरपूर जणांचा त्याचा फायदा झाला आहे निशा बोलते चालेल मग कधी व कोठे भेटेल तो त्याला एखाद्या वेगळ्या ठिकाणी भेटावे लागेल का विशाखा म्हणते नाही तो आपल्याच गावात भेटेल व व मला त्याचे घर माहित आहे निशा बोलते की हो मग तर काम अगदी सोपे झाले विशाखा म्हणते हो निशा बोलते मग आपण उद्या त्या व्यक्तीकडे जाऊ


मग विशाखा म्हणते हो चालेल आकाश पेपर वाचत असतो पेपर वाचता वाचता तो निशा आणि विशाखाचे बोलणे ऐकतो व मग त्यालाही त्यांच्या एकलेल्या बोलण्यात काहीतरी तथ्य वाटते मग त्यालाही वाटते की मी त्यांच्यासोबत जावे मग आकाश विशाखा ला विचारतो की मी ही तुमच्या सोबत सुरेश कडे येईल विशाखा म्हणते हो चालेल ना .

तर निलेश ही त्याच गणगणीत असतो की असा मला एखादा व्यक्ती किंवा तांत्रिक मांत्रिक भेटायला पाहिजे की तो मला मदत करेल कोण असेल तो कुठे भेटेल तो याच विचारात तो असतो मग निलेश याच विचारत असताना त्याला त्याच्या एका मित्राचा फोन येतो मग निलेश फोन उचलतो व त्याच्याशी दहा ते पंधरा मिनिटे बोलतो मग त्याचा मित्र त्याला विचारतो की सध्या काय चालू आहे तुझे काही समजत नाहीये मला आधी तू स्वतःच फोन करायचा चार-पाच दिवसांपासून मला तू फोन पण नाही केला काय झाले मला तरी सांग मग निलेश त्याला घडलेली सर्व गोष्ट सांगतो हे एकूण त्याचा मित्र जरा शॉक मध्ये जातो व तो म्हणतो तू काळजी करू नको मी आहे तू फक्त दोन-तीन दिवस थांब मी तुला एक व्यक्ती किंवा तांत्रिक सापडण्यास मदत करतो हे ऐकून निलेश ला जरा बरे वाटले निलेश त्याच्या मित्राला थँक्स बोलतो व फोन ठेवतो व नंतर तो मनोमन बोलतो की असा आहे माझ्याकडे कोणीतरी की तो मला मदत करू शकेल व तो आनंदी होऊन थोडेसे स्मित हास्य करतो निलेश ला वाटते की थोडे का होईना पण टेन्शन कमी झाले माझे


तिकडे निशा तिच्या आई-वडिलांसोबत सुरेश कडे जायला निघतात ज्यावेळेस निशा सुरेश च्या घराच्या पहिल्या सुरुवातीचा जो दरवाजा असतो तिथे ती उभी असते व सुरेश हा मध्ये घरात असतो त्याला आपोआप समजते किंवा त्यांच्याकडे काहीतरी दैवशक्ती असल्याने त्याला समजते की कोणीतरी घराच्या दरवाजा मध्ये उभे आहे ते ती जाऊन लगेच कोण आहे ते बघतो सुरेश चे लक्ष पहिल्यांदाच निशाकडे जाते व त्याला तिच्याविषयी सर्वच काही म्हणजे ती कोण आहे मागच्या जन्मात कोण होती व माझ्यासारखीच तिला देवीने शक्ती दिली आहे सगळं समजण्याची मोजून त्याला पाच ते दहा मिनिटात समजते व तो त्यातून बाहेर पडतो व निशा व तिच्या आई-वडिलांना त्याच्या घरात यायला सांगतो व सोप्यावर बसा मी आलोच असे सांगतो व तो जातो हो मग तोपर्यंत निशा आणि ते सोप्यावर बसतात तेवढ्यात सुरेश येतो व त्यांना विचारतो की तुमचा काय प्रॉब्लेम आहे सांगा मी सोडवतो व मग निशा घडलेली सर्व घटना सुरेशला सांगते सुरेशला निशाकडे बघून आधी सर्वच काही समजले होते व पण सुरेश ला ते दाखवायचे नव्हते म्हणून सुरेश तिचे बोलणे ऐकून आश्चर्य झाल्यासारखा चेहऱ्यावर हावभाव आणतो तर सुरेश सांगतो की मी यावर काहीतरी समाधान शोधतो किंवा मी याचे उत्तर देतो पण आता नाही निशा म्हणते मग कधी सांगणार तुम्ही सुरेश म्हणतो तुम्ही या महिन्यातील जी पहिली अमावस्या येणार आहे त्या दिवशी तुम्ही सर्वजण याच ठिकाणी या तुम्हाला याचे उत्तर मिळून जाईल मग निलेश चा मित्र निलेश ला त्या व्यक्तीचे नाव सांगतो त्या व्यक्तीचे नाव आर्यन असते त्याला सुरेश सारखे सर्वच काही समजत असते निलेश त्याच्या मित्राला विचारतो की ही व्यक्ती कुठे भेटेल


कधी भेटेल तेव्हा त्याचा मित्र म्हणतो हा व्यक्ती नाशिकला असतो ना उद्या आपल्याला भेटेल त्याचे व माझे बोलणे झाले आहे मग आपण उद्या त्या ठिकाणी जाऊ निलेश म्हणतो हो चालेल


मग निलेश त्याचे आई-वडील लीला व योगेश ला त्याचा व त्याच्या मित्रासोबत चे झालेले बोलणे सांगतो हे एक मुलीला व योगेशला जरा समाधान वाटते व त्यांचे टेन्शन कमी झाले मग लिला व योगेश निलेश ला विचारतात की आम्हीही तुझ्यासोबत येऊ का निलेश म्हणतो हो चालेल ना तुम्ही उद्याच्या तयारीत रहा लीला व योगेश म्हणतात हो हो निलेश त्याच्या मित्राला कॉल करून सांगतो की माझी मम्मी व पप्पा पण माझ्यासोबत येणार आहे तुला चालेल ना की त्यांना कॅन्सल करू मग त्याचा मित्र म्हणतो मला त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही मला चालेल निलेश म्हणतो बरं बाय ठेवू का फोन त्याचा मित्र म्हणतो हो .


मग दुसऱ्या दिवशी सर्वजण आर्यन कडे नाशिकला जातात व आर्यनला झालेली सर्व घटना निलेश सांगतो आर्यन सांगतो की मला सध्या खूपच असे काम आहे व खूपच माझ्याकडे गर्दी आहे तुम्ही काम करा मी तुम्हाला एका व्यक्तीकडे जायला सांगतो तुम्ही जाऊ शकता का निलेश म्हणतो हो चालेल पण त्यांच्याविषयी मला माहिती द्या म्हणजे कुठे राहतात काय ते व कॉन्टॅक्ट नंबर पण द्या कॉल करण्यासाठी आर्यन म्हणतो हो चालेल


मग आर्यन त्या व्यक्तीची सर्व इन्फॉर्मेशन निलेश ला देतो आर्यन ज्या व्यक्तीचे नाव सांगतो ती दुसरी तिसरी कोण ही नसून सुरेशच असतो मग निलेश त्या व्यक्तीला फोन करतो व मग सुरेश त्याला सांगतो की तुम्ही या महिन्यातील पहिली अमावस्या आहे त्या अमावस्येच्या दिवशी या निलेश म्हणतो हो चालेल व सुरेश चा फोन ठेवतो व त्याचा नंबर सेव्ह करून ठेवतो सुरेश चा शिष्य आर्यन असतो म्हणून आर्यनने निलेश ला सुरेश चा नंबर दिला तो अमावस्येचा दिवस यायला भरपूर दिवस बाकी असतात निलेश व निशा याच आनंदात असतात का आपला प्रॉब्लेम सॉल होणार आहे दोन ते तीन दिवस सर्वच याच आनंदात असतात व मग एवढे सर्व घडल्यावर निशा व निलेश ला ते स्वप्न उलगडत चालले