Hadaga.. in Marathi Women Focused by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | हादगा ..

Featured Books
Categories
Share

हादगा ..

ऐलोमा पैलोमा गणेश देवा माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा ..रेडिओवर हे गाणे ऐकताना हादग्याच्या आठवणीनी मन जणु झुल्यावर झुलू लागलं🐘 माझ्या लहानपणी मुलगी सात आठ वर्षाची झाली की हादगा घालावा अशी घरी चर्चा सुरु व्हायची .मुलीना तर हादगा घालायची कधीचीच गडबड झालेली असायची कारण सोबतच्या मैत्रिणींच्या घरी हादगा खेळायला त्या जात असत .त्यामुळे ती गंमत आपल्या घरी कधी होणार ह्याची आतुरता खुप असायची .😊🐘आश्विन महिन्यात हस्त नक्षत्राचा आरंभ होतो.त्या दिवसापासून पुढचे सोळा दिवस किंवा नवरात्राच्या पहिल्या दिवसा-पासून पौर्णिमेपर्यंत हदग्याच्या निमित्ताने मुली एक खेळ खेळतात. ह्या खेळाला हादगा म्हणतात. तसेच यास भोंडला असेही नाव आहे. काही ठिकाणी याला भुलाबाई म्हणून सुद्धा ओळखले जाते🐘हादग्याच्या खेळात जमिनीवर किंवा पाटावर रांगोळीने किंवा धान्याने हत्तीचे चित्र काढतात.रंगीबेरंगी फुलांच्या माळा घालून त्या चित्रातल्या हत्तीला सजवतात. त्याच्या भोवती रांगोळी काढतात त्या हत्तीची पूजा करून त्याच्या भोवती फेर धरून मुली वेगवेगळी गाणी म्हणतात. त्यांना हादग्याची गाणी असे म्हटले जाते 🐘या गाण्यातून सर्वात आधी गणेश देवतेला आवाहन करायचे .आणी आपल्या संसाराचा खेळ व्यवस्थित मांडला जावा अशी प्रार्थना करायची मग वेगवेगळी भारतीय संस्कृती , इतिहास , पुराण यांच्या कथा सांगितल्या जायच्या .काही काही वेळा या गाण्यातून काही नर्मविनोदी कथा पण असायच्या .हस्त नक्षत्र लागल्या दिवशी हादगा सुरु होतो तो दसऱ्याला संपतो .🐘एकंदर सोळा दिवस हा हादगा चालत असे . .सोळाव्या दिवशी याचे उद्यापन केले जायचे  .याची गाणी आज एक उद्या दोन परवा तीन अशा क्रमाने वाढत म्हणायची असत.सोळाव्या दिवशी हौसेने सोळा गाणी म्हणली जायची .🐘गाणी गाऊन झाली की खिरापत वाटप असे .खिरापत म्हणजे वेगवेगळे पदार्थ ..पण ही खिरापत ओळखायची असे .काही काही घरात आजी ,आई इतक्या हौशी असत की त्या खिरापती पण गाण्या प्रमाणे वाढवत .म्हणजे पहिल्या दिवशी एक खिरापत दुसऱ्या दिवशी दोन अशा खिरापती करीत .या क्रमाने सोळाव्या दिवशी सोळा खिरापती म्हणुन जवळ जवळ जेवण व्हायचे .  🐘जी मुलगी ही खिरापत ओळखेल तीचे कौतुक होऊन तिला खिरापतीचा जास्त वाटा मिळत असे .🐘एकीच्या घरचा हादगा झाला की दुसरीच्या घरी जायचे हादगा खेळायला .असे रोज सात आठ घरी तरी हमखास हादगा असेच ..!!🐘शाळा सुटून घरी आले की हातपाय धुवून कपडे बदलुन हादगा खेळायला जायची गडबड सुरु व्हायची .या दिवसात अभ्यास झाला का ?..आता कुठे निघालीस ?कधी येशील ?अशा प्रकारचे आईचे प्रश्न पुर्ण बंद असत .🐘एरवी त्या काळी आम्हा मुलीना सात वाजण्याच्या आत घरी आलेच पाहिजे असा दंडक असे .पण या दिवसात ही वेळेची मर्यादा पुर्ण शिथिल असे .!!मस्त हुंदडायला मिळायचे मला त्या दिवसात .शिवाय वेगवेगळ्या पदार्थांची  रेलचेल खायला मिळायची ते वेगळेच ..माझ्या तर इतक्या मैत्रिणी होत्या की दोन तीन तास रोज माझे हादगा खेळण्यात जायचे . 🐘 हादग्याचे पहिले आठ दहा दिवस संपले की आमचा गाण्यांचा स्टॉक संपत असे मग आम्ही तेवढीच गाणी इतर दिवशी पण गात असु .🐘आमच्या घरमालक आजी  ज्याना आम्ही काकी म्हणत असु .त्याना सोळा पेक्षा ही जास्त गाणी येत असत .त्यांच्या दोन नाती होत्या त्यांचा हादगा त्या घालत असत त्या आम्हाला  वेगवेगळी गाणी सांगत आणी आम्ही म्हणत असु .त्यांच्या घरच्या हाद्ग्याला त्यांच्या गाण्यांच्या स्टॉक  मुळे  खुप मुली येत असत शिवाय त्या इतक्या विविध खिरापती करीत की त्या ओळखायला पण मजा येत असे आणि नंतर खायला पण धमाल 💕💕          🐘या व्यतिरिक्त आमची मुलींची शाळा असल्याने शाळेत पण हादगा असे .रोज शेवटचे दोन तास ऑफ असततेव्हा प्रत्येक वर्गाचा वेगळा हादगा खेळला जात असे तेव्हा प्रत्येक इयत्तेच्या दोन किंवा तीन तुकड्या असत त्यामुळे शाळेच्या ग्राउंड वर हा कार्यक्रम चाले.🐘वर्गात पस्तीस ते चाळीस मुली असत .रोज दोघी तिघी खिरापत आणत त्यामुळे दिवस भर वर्गातल्या शिकवण्याकडे आमचे लक्षच नसे कधी एकदा हादगा खेळतो आणि खिरापती खातो    असे होत असे .! 😀😀  🐘 आपली खिरापती शक्यतो ओळखली जाऊ नये अशी प्रत्येकीची खटपह असे शाळेत एकदा माझ्या मैत्रिणीने कोणाला पटकन ओळखू नये अशी खिरापत हवी म्हणुन छोटे छोटे टोमॅटो  आणले होते .आपली खिरापत कोणीच ओळखणार नाही याची तीला खात्री होती .हादगा खेळायला म्हणुन जेव्हा दुसऱ्या मजल्या वरून सर्वजणी पळत पळत निघाल्या तेव्हा अचानक एका मुलींचा धक्का लागुन तीच्या हातातील डबा पडला आणी सर्व टोमॅटोनी  जिन्या वरून खाली उड्या घेतल्या 😀😀मग काय मुलींच्या पायाखाली तुडवले गेल्याने त्यांची नासाडी झाली .मैत्रिणीला इतके वाईट वाटले .खुप रडली बिचारी .😓😓  🐘  तसेच एकदा खिरापत म्हणुन माझ्या आईने बटाटा घालून मसालेदार पुऱ्या दिल्या होत्या .ही खिरापत ओळखली जाणार नाही असे मलाही वाटत होते .घरात पुऱ्या तळताना मस्त लसुण मिरची कोथिंबीर घातलेल्या त्या पुऱ्याचा खमंग वास सुटला होता .शाळेत गेल्यावर जेव्हा वर्ग सुरु झाला त्यानंतर काही वेळात हा खमंग वास वर्ग भर पसरला .😀सर्व मुली अस्वस्थ झाल्या होत्या ...आणी मग माझे काहीही न ऐकता त्यांनी दुपारच्या सुट्टीत पुऱ्यावर ताव मारला .माझी खिरापत ओळखण्या आधीच पोटात गुडूप झाली .🐘एकदा हादग्याच्या शेवटच्या दिवशी घरी खिरापत म्हणून आईने गव्हलेभात केला होता त्यासाठी शाळेच्या नोकरीतून आणि घरच्या कामातून वेळात वेळ काढून जास्तीचे गव्हले घरी केले होतेकोणालाच ही खिरापत ओळखली नाही जेव्हा मैत्रिणींनी तो चवीष्ट भात खाल्ला तेव्हा त्या अतीशय खूष झाल्या होत्या 😋😋🐘अशा आठवणी हादग्याच्या ..💕आता काही ठिकाणीं हादगा घालतात खुप बायका मुली जमतात .गाणी पण गायली जातात .अगदी महाहादगा सुद्धा खेळला जातो पण माझ्या लहानपणीची ती मजा आता नाही    ❤️❤️  !!!